
no images were found
कोल्हापूर जिल्हा व शहर रेणुका भक्त संघटनेच्या वतीने श्री.राजेश क्षीरसागर यांचा सत्कार
कोल्हापूर : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. महाराष्ट्र शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करून १०० टक्के खोळंबा आकार माफ केला आहे. परंतु यंदाच्या वर्षी एस.टी. महामंडळाने एसटी भाड्यापोटी ३७० किलोमीटरने तीन दिवसांची भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भाडे प्रति किलोमीटर ५४ रुपये धरले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील भक्तांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार होता. याविषयी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे साहेब यांची शनिवारी मध्यरात्री भेट घेऊन विनंती केली. मुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे यांनी तात्काळ परिवहन आयुक्त शेखर चेन्ने यांना फोन करून आदेश दिले. त्यानुसार तीन दिवसांच्या यात्रेसाठी कोल्हापुरातील भाविकांच्याकडून आता ३७० किलोमीटरचे प्रती किमी रु.३४ प्रमाणे भाडे आकारणी होणार आहे. त्यामुळे प्रती एस.टी. मागे रु.६२ हजारांचा होणारा खर्च मुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे रु.२० हजारांच्या आसपास येणार आहे. त्यामुळे सौंदत्ती यात्रेकरूंचे रु.८० लाख रुपये वाचणार आहेत.
याबाबत कोल्हापूर जिल्हा श्री रेणुका भक्त संघटना आणि श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटना यांच्या वतीने मुख्यमंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे आभार मानले. यावेळी संघटनेच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष श्री.युवराज मोळे, उपाध्यक्ष गजानन विभूते, संस्थापक सदस्य अच्युत साळोखे, श्रीमती शालिनी सरनाईक, सौ.लता सोमवंशी आणि करवीर निवासीनी रेणुका भक्त सेवा संस्था पदाधिकारी विजय पाटील, प्रशांत खाडे, प्रदीप साळोखे, संजय मांगलेकर, उदय पाटील, श्रीकांत कारंडे, सुनिल मोहिते, किरण मोरे, सुरेश बिरंबेळे, बाबुराव पाटील, मंगल महाडीक, अनिता पोवार आदी उपस्थित होते.