no images were found
कोल्हापूर अर्बन बँकेच्या संचालक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलची बाजी
कोल्हापूर : येथील कोल्हापूर अर्बन बँकेच्या संचालक निवडणुकीत सत्तारूढ कणेरकर – शिंदे गटाचे पॅनेल विजयी झाले आहे. या निवडणुकीसाठी रविवारी ४७ टक्के मतदान झाले होते. संचालकपदाच्या १५ जागांसाठी ही निवडणूक झाली असून ३५ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत सत्तारूढ कणेरकर – शिंदे विरुद्ध भास्करराव जाधव पॅनेल अशी लढत रंगली होती. यामध्ये सत्ताधारी पॅनेलच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला आहे.
रविवारी मतदान झाल्या नंतर मंगळवारी सकाळपासून मतमोजणी सुरु झाली. त्यासाठी प्रत्येक केंद्रासाठी एक याप्रमाणे ४० टेबलावर ही मोजणी झाली. या संचालक निवडणुकीत शिरीष कणेरकर, संभाजी जगदाळे, ऍड. रवींद्र धर्माधिकारी, राजन भोसले, नंदकिशोर मकोटे, जयसिंग माने, अभिजित मांगुरे, ऍड. प्रशांत शिंदे, मधुसूदन सावंत, ऍड. यशवंतराव साळोखे, काटकर गजानन (विमुक्त जाती / भटक्या जमाती अथवा विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी), संध्या घोटणे (महिला प्रतिनिधी ), सुनीता राऊत (महिला प्रतिनिधी ), भांबुरे शंकरराव (इतर मागासवर्ग प्रतिनिधी), नामदेवराव कांबळे (अनुसूचित जाती जमाती) आदी उमेदवार विजयी झाले आहेत. गुलालाची उधळण करून विजयी उमेदवार व त्याच्या समर्थकांनी जल्लोष केला.