
no images were found
राष्ट्रीय स्तरावरील DST-STUTI प्रशिक्षण कार्यक्रम मंगलोर विद्यापीठात
प्रा. सोनकवडे यांनी मंगळूरू विद्यापीठात शास्त्रीय पद्धतीने वाजवला स्तुतिचा डंका
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST), भारत सरकार द्वारे प्रायोजित ‘सात दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रम’ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर च्या सहकार्याने मंगळूरू विद्यापीठ, मंगलगंगोत्री येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मंगळूरू विद्यापीठाच्या DST-PURSE इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर, CARRT & MHRD-RUSA NMR इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहे. हा शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात येणारा अकरावा कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी कर्नाटक विद्यापीठ, धारवाड चे माननीय कुलगुरू प्रा.के.बी. गुडासी यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी उपकरणे हाताळण्याची योग्य प्रक्रिया, परिणाम मिळवणे आणि उपकरणांचे महत्त्व विशद केले. विविध योजनांद्वारे संशोधन उपक्रम अंतर्गत विश्लेषण संदर्भात भारत सरकार प्रोत्साहन देत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सन्माननीय अतिथी प्रा.राजेंद्र जी. सोनकवडे, यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सरकार राबवित असलेल्या अनेक योजनांचा उल्लेख केला. त्याचबरोबर त्यांनी आत्मनिर्भर भारताची गरज पूर्ण करणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकसित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळूरू विद्यापीठ चे माननीय कुलगुरू प्रा. पी. सुब्रह्मण्य यादपादितय होते. सर्वोत्तम संशोधन परिणाम आणण्यासाठी मंगळूरू विद्यापीठ अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रे यांच्याशी सहयोगात्मक संशोधन स्थापन करण्यात गुंतलेले आहे असे मत त्यांनी मांडले. त्याचप्रमाणे, त्यांनी सुविधेमध्ये उपकरणांची भविष्यसूचक, प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक देखभाल अत्यंत महत्त्वाची आहे असा उल्लेख केला. स्तुति प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याच्या चांगल्या उपक्रमाबद्दल भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (DST) अभिनंदन केले. त्याचबरोबर ही संधी मंगळूर विद्यापीठाला मिळवून दिल्याबद्दल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि प्रा. सोनकवडे यांचे विशेष आभार मानले.
हा कार्यक्रम विद्यापीठात आयोजित केल्याबद्दल कर्नाटक विद्यापीठ, धारवाड चे माननीय कुलगुरू प्रा.के.बी. गुडासी यांनी मंगळुरु विद्यापीठाचे कौतुक केले. अतिशय प्रभावीपणे अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रा. राजेंद्र सोनकवडे यांचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती. या आठवड्याभराच्या कार्यक्रमात, देशभरातील 40 संशोधक प्रशिक्षण घेणार आहेत. संशोधनात अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्याविषयी नामवंत प्राध्यापक आणि नामांकित संस्थांचे शास्त्रज्ञ आणि ॲप्लिकेशन इंजिनीअर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी संसाधन व्यक्ती म्हणून सहभागी होणार आहेत.
CARRT चे समन्वयक आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे सह-संयोजक प्रा.करुणाकर एन. हे देखील उपस्थित होते. DST-PURSE इन्स्ट्रुमेंटेशन सेंटरचे समन्वयक आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. बी. विशालाक्षी यांनी सर्वांचे स्वागत केले आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला, त्याच बरोबर DST-STUTI योजनेच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. लाविना ग्लॅडिस सेराव यांनी सूत्रसंचालन केले. DST-PURSE इन्स्ट्रुमेंटेशन सेंटरचे उप-संयोजक आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे सह-संयोजक, प्रा. बोजा पुजारी यांनी आभार मानले.