
no images were found
‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने’चे अर्ज करण्यास 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
कोल्हापूर : देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना’ सन 2022-23 करीता अर्ज करण्यास 7 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.
देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने’ साठी सन 2022-23 करीता विद्यार्थ्यांकडून जाहिरातीव्दारे अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, शैक्षणिक संस्थांमधील सन 2022-23 मधील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याने मागविण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
योजनेकरीता अर्जाचा नमुना, अटी व शर्ती शासन निर्णय व अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या लिंकला पहावी. ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे’ अर्ज आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्चरोड, पुणे- 1 यांच्याकडे दि. 7 डिसेंबर रोजी सायं.6.15 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहनही श्री. लोंढे यांनी केले आहे.