
no images were found
अबब ! डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढला तब्बल ४ फुटाचा साप
मुंबई : महिला झोपेत असताना साप तिच्या पोटात गेला. तब्बल चार फूटाचा साप पोटात कसा जाऊ शकतो हा प्रश्न आपल्याला पडेल. हा डॉक्टर एका महिलेच्या तोंडातून तब्बल चार फूटाचा साप काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.
साप बघितला तरीही आपल्या अंगावर काटा येतो. साप जर जवळ आला तर मग सोडाच.. आपली पळता भुई थोडी होते. पण एकाद्याच्या पोटात साप गेल्याचं ऐकलं तर? आपला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. पहिल्यांदा ऐकल्यावर आपल्याला किळसवाणं वाटेल पण एका महिलेच्या पोटात तब्बल ४ फूटाचा साप गेल्याची घटना घडली आहे.