
no images were found
आंबेगाव तालुक्यातील जवान शहीद
पुणे : येथील आंबेगाव तालुक्यातील लौकी येथील रहिवासी असणारे लस्करातील जवान सुधीर पंढरीनाथ थोरात (वय ३२) मध्यप्रदेश ग्वालियर येथे ते शहीद झाले आहेत. सुधीर हे अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी येताच त्यांच्या घराबाहेर मोठा जनसागर उपस्थित झाला आहे.
२०१४ पासून भारतीय सुरक्षा फोर्समध्ये (BSF) सुधीर थोरात हे कार्यरत होते. त्यांना घोडस्वारीमध्ये अनेक सुवर्णपदके मिळालेली आहेत. तसेच पुढील दोन दिवसांत ग्वालियर या ठिकाणी घोडेस्वारीच्या इंटरनॅशनल स्पर्धा होणार होत्या. मात्र, त्या स्पर्धेचा सरावादरम्यान रविवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे घोड्यावरून पडून घोड्याची टाप त्यांच्या डोक्याला लागल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फौजी सुधीर यांच्या पश्चा त आई, वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. घोडस्वारी संपल्यानंतर ते याच महिन्याच्या ३० तारखेला सुट्टीवर येणार होते. सुधीर थोरात यांच्यावर त्यांच्या मूळ गावी लौकी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कमी वयात असं मरण आल्याने गावावर शोककळा पसरली आहे.