Home सामाजिक जिल्हास्तरीय युवा उत्सवासाठी 26 सप्टेंबरपर्यंत नोंदणी फॉर्म सादर करावेत

जिल्हास्तरीय युवा उत्सवासाठी 26 सप्टेंबरपर्यंत नोंदणी फॉर्म सादर करावेत

2 second read
0
0
270

no images were found

जिल्हास्तरीय युवा उत्सवासाठी 26 सप्टेंबरपर्यंत नोंदणी फॉर्म सादर करावेत

कोल्हापूर : नेहरु युवा केंद्रामार्फत आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे दि. २९ सप्टेंबर रोजी राजाराम महाविद्यालय येथे सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी १५ ते २९ वयोगटातील जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या युवक -युवतींनी नोंदणी फॉर्म २६ सप्टेंबर पर्यंत सादर करावेत, असे आवाहन नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी कु. पूजा यांनी केले आहे. स्वातंत्र्यातील देशभक्तीची भावना व मूल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृद्धींगत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, भाषण स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हा युवा संमेलन ‘भारत @२०८७ युवा संवाद’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चित्रकला, कविता लेखन व छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकास १ हजार रुपये, द्वित्तीय क्रमांकास  ७५० रुपये व तृतीय क्रमांकास ५०० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, द्वित्तीय क्रमांकास २ हजार रुपये व तृतीय क्रमांकास १ हजार रुपये देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील विजेता स्पर्धक राज्यस्तरासाठी व राज्यस्तरावरील भाषण स्पर्धकांकरीता पात्र राहील. राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १० हजार रुपये व तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये आणि राष्ट्रीयस्तरावर प्रथम क्रमांकास २ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास १ लाख रुपये व तृतीय बक्षीस क्रमांकास ५० हजार रुपये असे आहे.

पात्रता- स्पर्धक जिल्ह्यातील रहिवासी असावा. वय १५ ते २९ वर्षे तसेच मागील वर्षामधील भाषण स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना यामध्ये सहभागी होता येणार नाही. एका व्यक्तीला फक्त एकाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम (समुहाकरीता) यामध्ये प्रथम ५ हजार रुपये, द्वित्तीय २ हजार ५०० व तृतीय १ हजार २५० रुपये आणि जिल्हास्तरिय युवा संमेलन- ‘भारत @२०४७ युवा संवाद या कार्यक्रमातील सहभागी युवकांमधून चार युवकांची परिक्षकांद्वारा निवड करून त्यांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धेच्या संदर्भातील नियम व अटी स्पर्धेचे विषय याकरिता नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विहित नमुन्यातील नोंदणी फॉर्म विनामुल्य नेहरू युवा कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळेल. अधिक माहितीसाठी ०२३१-२५४८९९९ या दूरध्वनी क्रमांकावर गणेश भोसले ७७५८८८५६५६ भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…