Home शासकीय बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर, उपसाधने पुरवठा योजना

बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर, उपसाधने पुरवठा योजना

0 second read
0
0
276

no images were found

बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर, उपसाधने पुरवठा योजना

कोल्हापूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय विचारेमाळ येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत रूपये 3 लाख 50 हजार राहील. त्यामध्ये 90 टक्के म्हणजेच रूपये 3 लाख 15 हजार  शासकीय अनुदान व स्वयंसहाय्यता बचत गटाचा हिस्सा 10 टक्के म्हणजेच रूपये 35 हजार इतका असेल.

इच्छुक स्वंयसहाय्यता बचत गटांनी संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज सादर करावेत. तसेच यापूर्वी म्हणजे सन 2021-22 मध्ये ज्या बचत गटांनी अर्ज सादर केले आहेत त्या पात्र लाभार्थी बचत गटांनी पुन्हा अर्ज सादर करू नये. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण, विचारे माळ येथे संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…