no images were found
पत्राचाळ घोटाळ्यात माजी मुख्यमंत्र्यांचा सहभाग? EDच्या आरोपपत्रामुळं खळबळ!
मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीनं ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना करण्यात आलं आहे. ईडीच्या आरोपपत्रात एका माजी मुख्यमंत्र्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे. पण हे माजी मुख्यमंत्री नक्की कोण आहेत? त्यांचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.
ईडीनं आपल्या आरोपपत्रातून दोन महत्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत. यामध्ये २००६-२००७ या कालावधीत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यामध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीनंतरच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून राकेश वाधवान यांच्याकडे पत्राचाळच्या विकसनाचं काम देण्यात आलं होतं. पण हे माजी मुख्यमंत्री कोण होते याच्या नावाचा उल्लेख ईडीनं आरोपपत्रात केलेला नाही. या घोटाळ्यात १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं ईडीनं चार्जशीटमध्ये म्हटलंय.
दरम्यान, पत्राचाळ प्रकरणातील घडामोडींची माहिती संजय राऊत यांना होती. तसेच या घोटाळातील सूत्रधार हे संजय राऊतच आहेत असं ईडीनं आरोपपत्रात म्हटलं आहे. या घोटाळ्यामध्ये राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं आहे.
वाधवान बंधूंसोबत संगनमत करून संजय राऊतांनी पत्राचाळ प्रकरणातून पैसे कमावले असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. पत्राचाळ प्रकरणातले प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचंही यात म्हणटलं आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आले आहेत, असाही उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे.