
no images were found
श्रद्धाच्या वडिलांचा ‘लव्ह जिहाद‘चा संशय
मुंबई : श्रद्धा वालेकर हिचा तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने खून करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते जंगलात टाकले आहेत. यासंदर्भात तिचे वडील विकास वालेकर यांनी.आपल्या मुलीचा मारेकरी आफताब अमीन पूनावालाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाबाबत त्यांनी ‘लव्ह जिहाद’ची शंका उपस्थित केली आहे.तसेच, श्रद्धाचा मृतदेह तशाच अवस्थेत फ्रीजमध्ये असताना त्याने त्याच घरात दुसऱ्या मुलीसोबत सेक्स केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आफताबने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा हिचे ३५ तुकडे करून निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर हे तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आहेत. श्रद्धाचे वडील विकास वालेकर म्हणाले, ‘मला या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय आहे. आम्ही आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहोत. माझा दिल्ली पोलिसांवर विश्वास आहे आणि तपास योग्य दिशेने सुरू आहे. श्रद्धा तिच्या काकांच्या खूप जवळ होती आणि माझ्याशी जास्त बोलली नाही. आफताबच्या संपर्कात मी कधीच आलो नाही. या प्रकरणाची पहिली तक्रार मी वसई, मुंबई येथे केली होती.दरम्यान, मुबईतल्या श्रद्धा वालकरच्या हत्येमुळे सध्या संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे होत आहेत. श्रद्धाच्या प्रियकराने सुनियोजित पद्धतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले श्रद्धाचा प्रियकर आफताबने तिचा खून केला, तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले होते. तिच्या खुनानंतर आफताब तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अॅक्टिव्ह राहत होता. श्रद्धाचा मृतदेह तशाच अवस्थेत फ्रीजमध्ये पडून होता. त्यावेळी आफताब दुसऱ्या एका मुलीच्या संपर्कात आला. डेटिंग अॅपच्या माध्यमातून आफताब या मुलीच्या संपर्कात आला होता. श्रद्धाचा मृतदेह घरात असताना त्याने त्याच घरात दुसऱ्या मुलीसोबत सेक्स केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पण, फक्त ही एकटीच नव्हती जी श्रद्धाचा मृतदेह घरात असताना या घरात आली होती. आफताबने डेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेक मुलींची भेट घेत त्यांच्यासोबत सेक्स केला होता. या प्रकारानंतर आता दिल्ली पोलीस बम्बल अॅपला पत्र लिहीत श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये असताना घरी आलेल्या महिलांची माहिती घेणार आहेत. तसंच या खुनामागे या महिलांपैकी कोणी आहे का, याची चौकशीही केली जाणार आहे.