Home क्राईम मुंबईतील ५ कोटींच्या फसवणुक प्रकरणी शिक्षण संस्थेच्या सचिवाला अटक

मुंबईतील ५ कोटींच्या फसवणुक प्रकरणी शिक्षण संस्थेच्या सचिवाला अटक

0 second read
0
0
27

no images were found

मुंबईतील ५ कोटींच्या फसवणुक प्रकरणी शिक्षण संस्थेच्या सचिवाला अटक

मुंबई : महाराष्ट्र रेल्वे गुड क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डाची रक्कम बनावट धनादेशाद्वारे हस्तांतरित करण्यात आली होती. याबाबत पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने छत्तीसगडमधील शिक्षण संस्थेच्या सचिवाला नुकतीच अटक केली. अरुणोदय शिक्षण समितीचे सचिव हेमशंकर जेठमल (४७) यांना नुकतीच आर्थिक गुन्हे शाखेच्या जनरल चिटींग-१ कक्षाने छत्तीसगड येथून अटक केली.
या प्रकरणात सहाय्यक कामगार आयुक्त अशोक डोके यांनी तक्रार केली होती. तक्रारीनुसार, त्यांच्याकडे महाराष्ट्र रेल्वे गुड क्लिअरिंग ॲण्ड फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. या मंडळाच्या खात्यातून बनावट धनादेशाद्वारे पाच कोटी रुपये काढण्यात आल्याची तक्रार डोके यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. या बोर्डाच्या अंतर्गत असंरक्षित कामगार कल्याणाचे काम सोपविण्यात आले आहे. मंडळाच्या अखत्यारितील रक्कम एका राष्ट्रीकृत बँकेच्या खात्यात जमा करण्यात आले होते. गेल्या महिन्यात मंडळाचा हिशेबनीस व त्याचा सहकारी बँकेच्या मशीद बंदर येथील शाखेत गेले. त्यावेळी पासबूक नोंदीनुसार त्यात खात्यात पाच कोटी सहा लाख रुपये कमी असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली असता ७ जानेवारी ते २ मार्च २०२१ या कालावधीत बनावट धनादेशाद्वारे रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. आठ बनावट धनादेशांद्वारे ही रक्कम मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे. तेथील कंपन्या, शिक्षण संस्थांची बँक खाती यात पाच कोटी रुपये जमा झाले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…