no images were found
जिल्हाधिकारी कार्यालयावर गायरान अतिक्रमणप्रश्नी सर्वपक्षीय महामोर्चा
कोल्हापूर : गायरानमधील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळविण्यासाठी कोल्हापुरमध्ये सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला आहे. अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाला राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला. आजच्या या मोर्चात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी आवाहन केले होते. आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे उपस्थितीवरून दिसते.
गायरानमधील अतिक्रमण काढण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला दिल्यामुळे राज्य शासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे जिल्ह्यातील लाखो नागरिक बेघर होतील. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी याचिका राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर करावी, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्दचाची सुरुवात दसरा चौकातून झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा आल्यानंतर सर्व पक्षांच्या प्रमुखांची याठिकाणी भाषणे होतील.