
no images were found
सिंधुताई सपकाळ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण.
पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मांजरी येथील संस्थेमध्ये करण्यात आले. ममता बाल सदन, सन्मती बाल निकेतन संस्था, मनःशांती छात्रालय आणि वनवासी गोपालकृष्ण बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने सिंधुताईंची जयंती आणि बालदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी यावेळी बोलताना ‘अनाथ मुलांना जीवनदान देत सिंधुताई सपकाळ त्यांच्यासाठी मायेची सावली ठरल्या’ अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी तेथील लहान मुलांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी ममता सिंधुताई सपकाळ, ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड, मनःशांती छात्रालयाचे अध्यक्ष विनय नितवने यांची उपस्थिती होती. याचबरोबर नवीन संग्रहालयाचेही उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.