no images were found
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करावेत – सहायक आयुक्त विशाल लोंढे
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या शासन निर्णयमधील अटी व शर्तीनुसार पात्र असणा-या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाकडे परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे अवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यवसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेले जे विद्यार्थी मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असलेल्या परंतू प्रवेश न मिळालेलया विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी स्वाधार योजनेचा अर्ज करण्याकरीता अटी व शर्ती खालीलप्रमाणे-
- शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थी स्थानिक नसावा. (ज्या महाविद्यालय / शैक्षणिक संस्थेत विद्याथ्याने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते महाविद्यालय/ शैक्षणिक संस्था ज्या महानगरपालिका/नगरपालिका/ ग्रामपंचायत/कटक मंडळे यांच्या हद्दीत आहेत त्या महानगरपालिका/नगरपालिका/ग्रामपंचायत / कटक मंडळे येथील नसावा.)
- महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी सुध्दा या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
- 11 वी मध्ये प्रवेश घेणा-या व 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास 10 वी व 12 वीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
- 12 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा. तसेच पदवी नंतर पदव्युत्तर, पदवी/ पदविका अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा. (संबंधित अभ्यासक्रम शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी अनुज्ञेय असावा.)
अधिक माहितीकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग, समाजकल्याण कार्यालय, विचारे माळ, बाबर हॉस्पिटल शेजारी कोल्हापूर संपर्क क्र. ०२३१-२६५१३१८ येथे संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.