no images were found
बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी चौघांना १२ वर्षांची शिक्षा
नागपूरः ‘नकली नोटा चलनात आणणं हे दहशतवादी कृत्यासारखं आहे’, असे स्पष्ट करत नागपुरातील विशेष एटीएस न्यायालयाने बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी चौघांना १२ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
एटीएसने ऑक्टोबर २०१५ मध्ये शालिमार एक्स्प्रेसमध्ये बनावट नोटा पकडल्या होत्या. एका व्य्क्ठीला ताब्यात घेत जवळ जवळ साडेनऊ लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी नंतर आणखी ३ जणांना एटीएसने ताब्यात घेतले. या तिघांकडीलही लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. दरम्यान न्यायालयाने शेख गफ्फार, शेख सत्तार, मोहद ओबेदुल्ला, मीर अन्वरुल या चौघांनाही ६२ लाखांचा दंड ठोठावत बारा वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. बनावट नोटा चलनात आणणे हा देशाची अर्थव्यवस्था भ्रष्ट करण्याचा प्रकार असून हा प्रकार दहशतवादी कृत्यासारखा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.