कुंभी कासारी साखर कारखान्यावर चंद्रदीप नरके यांचा चौथ्यांदा झेंडा कोल्हापूर : कुडीत्रे तालुका करवीर येथील कुंभी कासारी सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आ. चंद्रदीप नरके यांच्या सत्तारूढ आघाडीने चौथ्यांदा बाजी मारत सर्व 23 जागेवर मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळवला. आ. पी एन पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीने निवडणुकीत चिवट झुंज दिली तरीही त्यांना एकही …