Home राजकीय मागण्यासंदर्भात लेखी आदेश काढावा;  तरच मागे फिरु नाहीतर ….

मागण्यासंदर्भात लेखी आदेश काढावा;  तरच मागे फिरु नाहीतर ….

2 second read
0
0
40

no images were found

मागण्यासंदर्भात लेखी आदेश काढावा;  तरच मागे फिरु नाहीतर ….

ठाणे : किसान सभेच्या  मोर्चाचे शिष्टमंडळ आणि शिंदे सरकार यांच्यात काल बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही, आणि जर मान्य केल्या तर सरकारकडून त्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च सुरूच राहिल. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील वाशिंद येथे शेतकऱ्यांचा मुक्काम आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वाशिंद येथे सध्या मुक्कामी हे शेतकरी असणार आहेत. दरम्यान, काल रात्री अवकाळी पावसाचा फटका या मार्चमधील शेतकऱ्यांना मोठा बसला तरी देखील हे सर्व शेतकरी आंदोलन आणि आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान आज किसान सभेच्या मागण्यांवर मुख्यमंत्री विधिमंडळात निवेदन सादर करणार आहे, त्यामुळे पुढे काय होतं याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

शासनाने आमच्या मागण्यांची  अंमलबजावणी झाली  तरच मागे फिरु नाहीतर ….

आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही जर विश्वास असता तर इथे यावेच लागले नसते असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. सर्व शेतकरी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात दाखल झाले आहेत. सर्वजण तिथेच थांबले आहेत. सर्व शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची वाट बघत आहेत. जर मागण्या मान्य झाल्या तरच मागे फिरु नाही तर पुढे जाऊ अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, काल रात्री पाऊस पडल्यानं बाजूला बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत काही शेतकरी झोपायला गेले होते. पण अंधार असल्यानं अंदाज न आल्यानं एक महिला शेतकरी पहिल्या मजल्यावरुन खाली पडली. त्या महिलेला दुखापत झाली आहे. तिला पहाटे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.

अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल बैठक झाली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दोन ते तीन तासांच्या बैठकीनंतर तोडगा निघाला आहे. काही मागण्या विचारधीन आहेत. जोपर्यंत अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत मोर्चा तूर्तास त्याच ठिकाणी मुक्कामी राहणार असल्याचे कॉम्रेड जीवा पांडू गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर शेतकऱ्यांनी लाँग मार्च आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…