Home क्राईम पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात

2 second read
0
0
109

no images were found

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात

 पुणे : पुणे – मुंबई एक्स्प्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची भीषण धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही कार चालली होती. उर्से टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भयानक होता की, यात गाडीचाही चक्काचूर झाला. अर्धी कार ट्रकखाली गेली आहे.

सकाळी ७.४५ मिनिटांच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. ट्रकचा बिघाड झाल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. त्याच वेळी भरधाव वेगाने कार आली आणि तिने थेट त्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. अतिवेगात गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तीनही मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांककडून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू असून कार मधील सर्वजण कुठले होते याचा तपास करण्याचे काम सुरू आहे. अपघातातील मृतांची ओळख पटवण्यात येत आहे. विजय विश्वनाथ खैरे, रा. सातारा या एकाच मृताचा ओळख पटली आहे. दोघांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन

केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन …