no images were found
गाव नकाशावरील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी 24 मार्चपर्यंत अर्ज करावेत – राहुल रेखावार
कोल्हापूर : नकाशावर असणा-या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी तसेच नकाशावर नसणारे अतिक्रमित, वहिवाटीचे रस्ते व पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठीचे अर्ज तालुक्यातील तहसिल कार्यालयामध्ये शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात बागायती शेतीचा जिल्हा आहे. बागायती शेतीच्या अनुषंगाने यांत्रिक शेतीकडे वाढलेला कल व बदललेल्या मशागत पध्दतीमुळे शेतात जाण्यासाठी बारमाही रस्त्यांची नितांत गरज जाणवत आहे. जिल्ह्यात शेत रस्ते, वहिवाटीचे रस्ते, पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी लोकसहभागातून, शासकीय व प्रशासकीय पातळीवर काम सुरु आहे. तरीही अजून बरेच रस्ते अतिक्रमित किंवा बंद असल्याचे आढळून येत आहे. यासाठी गाव नकाशावर असणारे रस्ते अतिक्रमण मुक्त करणे त्याचप्रमाणे नकाशावर नसणारे अतिक्रमित / बंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व शेतकरी- खातेदारांनी यासंबंधीचे अर्ज आपल्या तालुक्याच्या तहसिलदार कार्यालयात दिनांक 24 मार्च 2023 पर्यंत जमा करावेत.