no images were found
मालिका ‘भाबीजी घर पर है’ चे ८ वर्ष व २००० एपिसोड्स पूर्ण
हास्य व आनंदाचा प्रवास सादर करणारी लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’साठी दुहेरी सेलिब्रेशन आहे, जेथे मालिकेला ८ वर्ष व २००० एपिसोड्स पूर्ण होत आहेत. लोकप्रिय विनोदी मालिका हसवून-हसवून लोटपोट करणारी पात्रं व एपिसोड्ससह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि या दोन सुवर्ण टप्प्यांमधून मालिकेची प्रचंड लोकप्रियता दिसून येते. मालिकेच्या यशाबाबत एडिट २ प्रॉडक्शन्सचे निर्माता संजय कोहली म्हणाले, ‘‘आम्ही आठ यशस्वी वर्ष आणि २००० हून अधिक एपिसोड्स पूर्ण केले असल्यामुळे आमच्यासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. हा प्रवास अत्यंत समाधानकारक व लाभदायी राहिला आहे. मालिकेने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय विनोदी मालिका असण्याचा मान मिळवला आहे. अद्भुत विनोदी कन्टेन्टच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनात आनंद व हास्य आणणाऱ्या मालिकेसाठी प्रत्येक दिवस सेलिब्रेशन आहे. पण यासारखे क्षण अत्यंत खास असतात, कारण यामधून इतर मालिकांच्या तुलनेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत योग्य गोष्टी करत असण्यामधील आमचा विश्वास सार्थ ठरतो. हा अत्यंत धमाल व हास्यपूर्ण प्रवास राहिला आहे. मला अभिमान वाटत आहे आणि या यशाचे श्रेय सर्व कलाकार आणि एडिट २ व एण्ड टीव्हीच्या टीमला जाते. अथक मेहनत व यशसाठी सर्वांचे मनापासून अभिनंदन. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सतत प्रेम, पाठिंबा व कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या आमच्या प्रेक्षकांचे अभिनंदन.’’विभूती नारायण मिश्राची भूमिका साकारणारे आसिफ शेख म्हणाले, ‘‘२००० एपिसोड्स आणि आठ वर्षे आम्हा सर्वांसाठी मोठा मैलाचा दगड आहे. आम्हाला शिकवण, हास्य व आनंदाने भरलेला हा अद्भुत प्रवास पाहताना अत्यंत अभिमान वाटण्यासोबत आनंद होत आहे. मला या अद्भुत टीमचा भाग असण्याचा आनंद होत आहे आणि मला या मालिकेचा भाग होण्याची, तसेच विभुती नारायण मिश्राच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी दिल्याबद्दल निर्माते व चॅनेल यांचेमी आभार मानतो. या आठ वर्षांमध्ये मी साकारलेल्या प्रत्येक धमाल भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आणि त्यांच्याशी जुडले गेले आहेत. प्रत्येक भूमिका वरचढ आहे आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. अशा अनेक भूमिका साकारणे सोपे नाही, पण आज मी मागे वळून पाहतो तेव्हा मोठे यश मिळाल्यासारखे वाटते. आम्ही अथक मेहनत घेतली आहे आणि पुढे देखील घेत राहू, या यशस्वी टप्प्यासाठी टीमचे आभार. प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेम व प्रशंसेचा वर्षाव केला. मी माझ्या पन्नाशीमध्ये देखील ३० वर्ष वय असलेल्या विभूतीची भूमिका साकारत असल्यामुळे, तसेच अशा प्रतिभावान कलाकारांचा भाग असल्यामुळे स्वत:ला धन्य मानतो.’’अंगूरी भाभीची भूमिका साकारणाऱ्याशुभांगी अत्रे म्हणाल्या, ‘‘आम्हा सर्वांसाठी हा खास क्षण आहे. या मालिकेने मला मान्यता, प्रेम, प्रसिद्धी आणि कायमस्वरूपी स्मरणात राहतील अशा आठवणी दिल्या आहेत. मला भाबीजी टीमचा भाग असल्याने अत्यंत धन्य वाटण्यासोबत तितकाच अभिमान वाटतो. ही कामाप्रती टीमची समर्पितता आहे, जिचे फळ मिळाले आहे. आमचे निर्माते, सर्व कलाकार व टीम आणि निष्ठावान चाहते व प्रेक्षकांचे आभार. माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी आणि मला ही संधी देण्यासाठी मी चॅनेल व आमचे निर्माते संजय कोहली व बेनिफर कोहली यांचे आभार मानते. शेवटचे म्हणजे मी या मालिकेला प्रचंड यशस्वी करण्यामध्ये सतत त्यांचे प्रेम व पाठिंब्याचा वर्षाव करणारे प्रेमळ प्रेक्षक व चाहत्यांचे अभिनंदन करते.’’