no images were found
हसन मुश्रीफ यांचं काऊंटडाऊन सुरु : किरीट सोमय्या
कोल्हापूर : किरीट सोमय्यांनी अस्लम शेख यांना इशारा दिला आहे. त्यामुळे या सगळ्या कारवाईमागे विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना लक्ष्य करण्याचे षडयंत्र असल्याची शंका येते, असे मुश्रीफ यांनी म्हटले होते. मुश्रीफ यांच्या या आरोपांना किरीट सोमय्या यांना तात्काळ पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. हसन मुश्रीफ यांचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे.
त्यांनी गेल्यावर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी मला कोल्हापुरात येण्यापासून रोखले. त्यांनी मला महालक्ष्मीचे दर्शन घेऊन दिले नाही. पण आज महालक्ष्मी देवीने मला आशीर्वाद दिला. हसनमियाँना आता धर्म आठवतो. पण भ्रष्टाचार करताना आणि शेतकऱ्यांना लुटताना त्यांना धर्म आठवला नाही का? दोन बंद झालेल्या कंपन्यांमधून त्यांच्या कुटुंबाला ५० कोटी रुपये मिळाले. हे कुठल्या भ्रष्टाचाराचे पैसे होते? मी प्रथम अनिल परब, नंतर हसन मुश्रीफ आणि त्यानंतर अस्लम शेख यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना लक्ष्य करण्यात येत असल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.