no images were found
हसन मुश्रीफ समर्थक, कार्यकर्ते आक्रमक, कागल बंदची हाक
कागल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरावर आज दि.११ रोजी सकाळी ईडीने छापे टाकले. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, समर्थक आक्रमक झाले. त्यांनी या कारवाईच्या निषेधार्थ कागल बंदची हाक दिली.
दरम्यान, प्रकाश गाडेकर आणि आ. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानसमोर व निवासस्थानाच्या मार्गांवरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हसन मुश्रीफ हे मुंबई येथे आहेत. या प्रकरणी माहिती घेऊन बोलतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘ईडी’चे अधिकारी पोलिसांसोबत आज सकाळी कागल येथे आले. हसन मुश्रीफ व प्रकार गाडेकर यांच्या निवासस्थांनी ‘ईडी’ अधिकारी माहिती घेत आहेत. दरम्यान, कागल शहरातील देवी चौक आणि आ. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी मोठ्ठी गर्दी केल्यामुळे स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचा निषेध करीत आणि आ. हसन मुश्रीफ यांचा जयघोष करीत मोठ्या संख्येने निवासस्थाना समोर दाखल झाले आहेत .
[14:54, 1/11/2023] News Aakhada: मुश्रीफांकडून शांततेचं आवाहन
दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, आज सकाळपासून माझ्या घरावर, माझ्या मुलीच्या घरावर तसेच नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. मी कामानिमित्त बाहेर असल्याने मला दूरध्वनीवरून कारवाईची माहिती समजली. कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी, अशी मी विनंती करत आहे. कागल बंदची हाक देऊ नये, त्यांना तपासात सहकार्य करावे, अशी मी विनंती करत आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य माझ्या कार्यकर्त्यांनी करू नये.