
no images were found
२०२३ यंग ग्लोबल लीडर अवार्ड यादीत आदित्य ठाकरेयांचे सर्व स्तरातून कौतुक
मुंबई : राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्याने ठाकरे गटाला एकावर एक धक्के बसत आहेत.यातच आता ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय भरारी घेतली आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचा यंग ग्लोबल लीडर अवार्ड आदित्य ठाकरे यांना जाहीर झाला आहे.त्यामुळे सध्या ठाकरे गटात आंनदाचा वातावरण तयार झालं असून आदित्य ठाकरे यांचं सगळ्याचं स्तरातून कौतुक केलं जात आहे.
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने २०२३ मधल्या जागतिक युवा नेत्यांच्या यादीत शिवसेना नेते यांच्यासह ७ भारतीय तरूणांचा समावेश केला आहे. या यादित समाविष्ट केलेल्या भारतीयांमध्ये टीव्हीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, जिओ हॅप्टिक टेक्नोलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकृत वैश, बायोझिनचे सीईओ.बी. जोसेफ. भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई आणि पॉलिसी ४.० रिसर्च फाऊंडेशनच्या सीईओ तन्वी रत्ना यांचा समावेश करण्यात आला होता.
आदित्य ठाकरे हे शिवसेनेचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भवितव्य आहे हे मी आधीच सांगत होतो. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आदित्य ठाकरे यांचा या यादीत समावेश होणे हा महाराष्ट्राचा गौरव आहेच. पण देशाचाही गौरव आहे. देशात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे देशाला ऑस्कर मिळालं. तसेच जगातील शक्तीशाली तरुण नेतृत्वात आदित्य ठाकरे यांचा समावेश झाला. मंत्री म्हणून आणि राजकीय नेता म्हणून आदित्य ठाकरे यांनी ठसा उमटवला आहे. जागतिक पातळीवरून आदित्य ठाकरे यांच्या कार्याला दिलेली ही मान्यता आहे. आम्ही आनंदीत आहोत. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे आणि राज्याचे भवितव्य आहेत, हे मी वारंवार सांगतो होतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.