Home राजकीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठोकला तळ!

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठोकला तळ!

0 second read
0
0
5

no images were found

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठोकला तळ!

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन; डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रचार आणि संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. महायुतीच्या पदवीधरच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचे लक्ष्य समोर ठेवून पश्चिम महाराष्ट्रात भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठाण मांडत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील संघटनात्मक आढावा बैठकांद्वारे निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. मंडल तसेच जिल्हानिहाय बैठका, पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन यांच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीच्या नियोजनाला गती दिली आहे.

या बैठकांमध्ये निवडणुकीची रणनीती, मतदारांशी प्रभावी संपर्क, स्थानिक पातळीवरील समन्वय, बूथनिहाय नियोजन आणि पक्षसंघटनेच्या माध्यमातून प्रचार अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात आला. शिक्षक आणि पदवीधर मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका तसेच राज्य सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

पुणे विभागातील निवडणूक ही भाजपासह महायुतीसाठी केवळ उमेदवारांची लढत नसून संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेची कसोटी मानली जात आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करत भाजपा-महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असा निर्धार या बैठकांतून व्यक्त झाला.

पश्चिम महाराष्ट्रातील या व्यापक बैठकांमुळे निवडणूक तयारीला नवी दिशा मिळाली असून, विजयासाठी भाजपाने संघटनात्मक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.या बैठकांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्हास्तरावरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मतदारांपर्यंत सरकारच्या योजना आणि प्रभावी उपक्रम पोहोचविण्यासाठी बैठका घेत आहेत.

“पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही केवळ राजकीय लढत नसून, शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याची संधी आहे. मतदार नोंदणीपासून ते मतदारांशी थेट संवाद साधण्यापर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समन्वयातून भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपची संघटनात्मक मोर्चेबांधणी; २५ विधानसभा प्रभारींच्या नियुक्त्या!

पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपची संघटनात्मक मोर्चेबांधणी; २५ विधानसभा प्रभा…