Home उद्योग अदाणीच्या कच्छ कॉपरकडून ११५ मेगावॅट अक्षय ऊर्जेच्या वापराचे नियोजन; उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट

अदाणीच्या कच्छ कॉपरकडून ११५ मेगावॅट अक्षय ऊर्जेच्या वापराचे नियोजन; उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट

0 second read
0
0
6

no images were found

अदाणीच्या कच्छ कॉपरकडून ११५ मेगावॅट अक्षय ऊर्जेच्या वापराचे नियोजन; उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट

नवी दिल्ली:अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडची उपकंपनी असलेल्या कच्छ कॉपर लिमिटेडने आपल्या कामकाजात ११५ मेगावॅट अक्षय ऊर्जेचा समावेश करण्याचे नियोजन केले आहे.गुजरातमधील मुंद्रा येथे असलेल्या तांबे शुद्धीकरण प्रकल्पातील उत्सर्जन कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर वाढवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कंपनी सध्या वार्षिक ५ लाख टन क्षमतेचा तांबे वितळविण्याचा प्रकल्प चालवत असून, ही क्षमता वाढवून १० लाख टन करण्याची तिची योजना आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या विस्तारामुळे हा जगातील एकाच ठिकाणी असलेला सर्वात मोठा कस्टम स्मेल्टर प्रकल्प ठरेल.

आपल्या पहिल्या शाश्वतता अहवालात कच्छ कॉपरने पर्यावरण, सामाजिक जबाबदारी आणि सुशासन (ईएसजी) या घटकांचा आपल्या कामकाजात समावेश करण्याची योजना मांडली आहे. ऊर्जा संक्रमणातील गुंतवणूक, इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर, वीज पारेषण आणि औद्योगिक विस्तार यांमुळे तांब्याची मागणी वाढत असताना कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कंपनीने अहवालात म्हटले आहे की, “आमच्या शाश्वतता धोरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ११५ मेगावॅट अक्षय ऊर्जेचा नियोजित समावेश. आमच्या कामकाजाचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या आणि दीर्घकालीन कार्बन उत्सर्जन कपातीच्या उद्दिष्टांना पुढे नेण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान आणि विद्युतीकरणासाठी तांबे हा एक महत्त्वाचा घटक असल्याने कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये या धातूला विशेष महत्त्व आहे. उत्पादन क्षमता वाढवतानाच व्यावसायिक निर्णय, कामकाज आणि भागधारकांशी संवाद यांमध्ये शाश्वततेच्या घटकांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट कच्छ कॉपरने ठेवले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ती जवळपास १०० टक्के मिठाचे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्याचा वापर करते. तसेच, गोड्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी शून्य द्रव विसर्ग (झिरो लिक्विड डिस्चार्ज) पद्धतीचा अवलंब करते.

कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, “आम्ही सध्या सल्फर उत्सर्जनापैकी ९९.८ टक्के उत्सर्जनावर प्रक्रिया करून त्यावर नियंत्रण मिळवत आहोत. प्रगत पर्यावरणीय तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या जागतिक मानकांचा अवलंब करण्याप्रती असलेली आमची बांधिलकी यातून दिसून येते.”

उत्पादन क्षेत्रातील कामकाजाबरोबरच कंपनी आरोग्यसेवा, शिक्षण, उपजीविकेची साधने आणि सामाजिक विकासावर केंद्रित सामुदायिक कार्यक्रमांमध्येही गुंतवणूक करत असल्याचे तिने सांगितले. कंपनीच्या माहितीनुसार, अदाणी समूहाने या प्रकल्पासाठी १.२ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे. हरित पायाभूत सुविधा आणि पर्यावरण व्यवस्थापनातील गुंतवणुकीच्या माध्यमातून भारताचे २०७० पर्यंत कार्बन तटस्थतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशांतर्गत तांबे उद्योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे अदाणी समूहाचे मत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे-हेमंत पाटील

एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे-हेमंत पाटील : महाराष्ट्र …