Home Uncategorized सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा!

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा!

0 second read
0
0
39

no images were found

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा!

सांगली: गेल्या काही वर्षे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक घोटाळ्याने गाजत आहेत. त्यातच भर म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासन निधीवर दरोडा घालून कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडला आहे. यापूर्वी घडलेल्या घोटाळ्यांची निपक्ष:पातीपणे चौकशी होऊन दोषींच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे पत्राद्वारे राजू शेट्टी यांनी केली आहे.
बँकेच्या कामकाजात अनियमितता असून अनेक घोटाळे झालेले आहेत. याबाबत शासनाकडे लेखी तक्रार केली आहे मात्र शासनाकडून कोणतीच कारवाई केली गेलेली नाही.बँकेच्या संचालक मंडळाने व अधिकाऱ्यांनी केलेल्या कारनाम्यावर पांघरून घालण्याचे काम शासनच करत असल्याचे दिसून येऊ लागले आहे . याआधी जिल्ह्यातील अनेक संघटना व सामाजिक संस्थांनीही याबाबत तक्रारी केल्या. मात्र, त्याची काहीच चौकशी न झाल्याने बँकेचे संचालक मंडळ व अधिकाऱ्यांमध्ये घोटाळे करण्याचे धाडस वाढू लागले आहे.
सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये सोने तारण,ठेवीवरील व्याजासह,दुष्काळ,अतिवृष्ट,अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाई चे पैसे शासनाकडून जमा झाल्यानंतर बोगस खाती काढून पैसे परस्पर काढण्यात आलेले आहेत. सध्याचा झालेला घोटाळा सहा शाखांमध्ये झालेला असून यामध्ये बँकेने बोगस ताळेबंद दाखविले असल्याचे समजते. शेतकऱ्यांची लाईफ लाईन म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकांच्याकडे पहिले जाते. परंतु सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव,निमणी,सिद्धेवाडी,हातनूर,नेलकरंजी,बसर्गी या सहा शाखांमध्ये शासन निधीत दोन कोटी 43 लाख रुपयाचा अपहार प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये बँकेने आतापर्यंत पाच जणांचे निलंबन केलेले आहे. परंतु निलंबन न करता त्यांना कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करून अपहार केलेली रक्कम व्याजासहित वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…