no images were found
तृणमूल कॉंग्रेस नेत्याच्या घरात स्फोट; तीन ठार
कोलकता : माहितीनुसार पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नेरीबिला गावातील तृणमूल कॉंग्रेस नेत्याच्या घरात स्फोट झाला. यात तीन लोकांचा मृत्यू झाला. टीएमसीचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या नेरीबिला गावातील घरात शुक्रवारी (दि.२) रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटमध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. स्फोट इतका भीषण होता की, घराचे मातीचे छप्पर उडून गेले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी या नेत्यावर आरोप लावला आहे की, राज्यात बॉम्ब बनवण्याचा धंदा मोठ्याने सुरु आहे. तृणमूल कॉंग्रेस नेत्याच्या घरात बॉम्बसाठी लागणारे स्फोटक तयार करण्याचा उद्योग सुरु होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेवर काहीच बोलल्या नाहीत. यावर माकपचे वरिष्ठ नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले, ममता बॅनर्जी यांचं या घटनेवर काहीच न बोलणं आश्चर्यजनक आहे. तर टीएमसीचे राज्य सचिव कुणाल घोष यांनी सांगितले कोणत्याही पुराव्याशिवाय पक्षाला टार्गेट केलं जात आहे.