no images were found
चिन्या हळदकर खुनातील ३ संशयितांना अटक
कोल्हापूर : राजारामपुरी परिसरातील सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ चिन्या अजित हळदकर (रा. शाहूनगर) याच्या खुनातील तिघा संशयितांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. अटकेतील एकूण आरोपींची संख्या आता 11 झाली आहे.सुरज अरुण पाटील (वय २७ ) विश्वजित सुरेश निकम(दोघे रा. दौलतनगर), राहुल शिवलंब भिसे (२४, उजळाईवाडी), अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.
चिन्या हळदकरचा जमावाने पाठलाग करून यादवनगर येथे दगडाने ठेचून खून केला होता.२४ सप्टेंबरला रात्री उशिरा ही घटना घडली होती. याप्रकरणी मुख्य संशयित अभिषेक म्हेतर, महेश नलावडे, रोहन पाटील, शुभम कदमसह ८ जणांना अटक केली होती. सुरज पाटील, राहुल भिसे, विश्वजित निकम हे तिघे संशयित पसार झाले होते. गुरुवारी रात्री सुरू केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये फरारी संशयित सापडल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.