no images were found
टाटांचा अभिमान! महिलांना सर्वाधिक नोकरी देणाऱ्यांमध्ये पटकावले अग्रस्थान
मुंबई : देशात महिलांना रोजगार देणाऱ्या टॉप १० कंपन्यांची दुसरी यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीत सर्वात अग्रस्थानावर टाटा कन्सल्टनन्सी सर्व्हिसेसचे (TCS) नाव आघाडीवर आहे.
टाटांच्या कंपनीने सुमारे 2.1 लाख महिलांना रोजगार दिला असून, टांटांच्या एकूण कर्मचार्यांपैकी 35 टक्के महिला आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) नंतर इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या दिग्गज कंपन्याचा समावेश आहे. या कंपन्यांनी त्यांच्या एकूण कर्मचार्यांमध्ये अनुक्रमे ४०%, ३६%, २८ % आणि १८% महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. Axis Burgundy Pvt Ltd आणि Hurun India ने ही यादी प्रकाशित केली आहे.यादीतील कंपन्यांच्या संचालक मंडळावर १६ टक्के महिला आहेत. भारताची अर्थव्यवस्था जसजशी वाढत जाईल आणि या ५०० कंपन्यांचा विस्तार होईल तसतसे कंपन्यांच्या संचालक मंडळावरील महिलांचे योगदान वाढू शकते असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.