Home क्राईम बुलढाणा   जिल्ह्यात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात ; सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू तर 25 ते 30 जण जखमी 

बुलढाणा   जिल्ह्यात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात ; सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू तर 25 ते 30 जण जखमी 

4 second read
0
0
47

no images were found

बुलढाणा   जिल्ह्यात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात ; सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू तर 25 ते 30 जण जखमी 

बुलढाणा   जिल्ह्यातून मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती भीषण अपघात झालाची  बातमी समोर येत आहे. दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत.यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली आहे.  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्यानं अपघात झाला. एम एच 08. 9458 ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते.तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तातडीनं मदत कार्य सुरू केले आहे.

Load More Related Articles

Check Also

नैसर्गिकरित्‍या रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी दैनंदिन आहारामध्‍ये समाविष्‍ट केले पाहिजेत असे खाद्यपदार्थ

नैसर्गिकरित्‍या रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी दैनंदिन आहारामध् …