no images were found
सुळकुड पाणी योजनेला विरोध ; ग्रामस्थांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा
इचलकरंजी शहराला सुळकुड येथून थेट पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. या योजनेला मंजुरी मिळाली आहे.
मात्र आता त्याला कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध पाहायला मिळत आहे.
इचलकरंजी येथील सुळकुड पाणी योजनेला विरोध करण्यासाठी आज सुळकुड ग्रामस्थांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
कोणत्याही परिस्थितीत सुळकुड योजना होऊ देणार नाही असा पवित्रा घेत घोषणाबाजी करत आंदोलक ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. दरम्यान इचलकरंजी थेट पाईपलाईन प्रश्नावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार.
यासाठीच आज कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार संजय मंडलिक, भाजप नेते समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला दूधगंगा पाणी बचाव समितीचे सदस्य देखील उपस्थित असणार आहेत