no images were found
राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार द्विधा मनस्थितीत
पुणे : अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत सरळ आपला वेगळा गट तयार केला. या गटातील ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ २ जुलै रोजी घेतली.
अजित पवार यांच्या गटाकडून ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांना कोणता झेंडा घेऊ मी हाती…हा प्रश्न पडला आहे.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार द्विधा मनस्थितीत आहेत. . या आमदारांवर शरद पवार यांच्या गटाने लक्ष केंद्रीत केले आहे. शरद पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना फोन केले जात आहे. ठोस भूमिका घ्या, संघर्षाची भूमिका ठेवा, योग्य निर्णय घ्या विचार करून कळवा, हा निरोप आमदारांना देत आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शरद पवार गट करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना किती यश येईल, हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु काठावर असलेल्या आमदारांना शरद पवार गटात आणण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहे, हे यामुळे स्पष्ट झाले आहे.