no images were found
नांदेडमधील २५ गावांचाही आता तेलंगणा राज्यात जाण्याचा इशारा
नांदेड : महाराष्ट्र-कर्नाटक हा सीमा वाद चालू असतानात पुन्हा महाराष्ट्रात आणि तेलंगणा हा वाद चालू होण्याची चिन्हे आहेत. कारण नांदेड जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्यातील २५ गावांनीही आता तेलंगणा राज्यात जाण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. अनेक वर्षांपासून या गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने येथील लोक त्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व गावांचे सरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते यांची बासर येथे एक बैठक झाली.
या बैठकीमध्ये त्यांनी तेलंगणामध्ये सामील होण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. गावचा विकास नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, वाढता भ्रष्टाचार, रस्त्याची दुरवस्था, कामाच्या संधी या सगळ्यांचा गोष्टींचा त्रास या गावातील लोक सहन करत आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. मात्र यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारच्या आडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वरुन महाराष्ट्रात राजकारण तापलंय. पाणी प्रश्नावरुन जत तालुक्यातल्या काही गावांमध्ये कर्नाटकचे झेंडे फडकले. अशातच सोलापूरमधील २८ गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही जिल्ह्यांवर दावा सांगितला आहे. बोम्मई यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेले आहेत. राज्यातील एकही गावच काय जमिनीचा तुकडाही कर्नाटकाला जाऊ नये म्हणून राज्यसरकार जोरदार प्रयत्न करत आहे.