no images were found
डीकेटीईला इन्स्टिटयूशन इनोव्हेशन रॅकिंग मध्ये फोर स्टारचे मानांकन
इचलकरंजी ( प्रतिनिधी ):- भारत सरकारच्या शिक्षण मंत्रलायाच्या मिनीस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेल (एमआयसी) यांच्या इन्स्टियूट इनोव्हेशन कौंन्सिल ७.० २४-२५ या राष्ट्रीय मानांकनात डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इंस्टीटयूट या एम्पॉवर्ड अॅटोनोमॉस महाविद्यालयास देशपातळीवर फोर स्टारचे मानांकन प्राप्त झाले आहे. देशातील उच्च शिक्षण संस्थामध्ये नाविण्यपूर्ण संशोधन, स्टार्टअप, उदयोजकता आणि इनोव्हेशन संस्कृतीला चालना देणा-या संस्थामध्ये डीकेटीईने आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे.
इंस्टीटयूट इन्व्होवेशन रॅकिंग या मानांकनाला भारताच्या सर्व प्रमुख शैक्षणिक व व्यावसायिक गटांमध्ये व्यापक मान्यता आहे. देशामध्ये उच्च गुणवत्तेच्या संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी, उद्योजकता निर्माण करण्यसाठी आणि विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देण्यासाठी ही मानांकन यादी नवचैतन्य निर्माण करणार आहे.
इंस्टीटयूट इन्व्होवेशन कौन्सिलच्या माध्यमातून संस्थेने नवोपक्रम, बौध्दिक संपदा हक्क, संशोधन स्टार्टअप, उद्योजकता, उद्योग-संस्था सहकार्य आणि विद्यार्थ्यांमधील सर्जनशिलतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. याशिवाय संस्थेतील स्टार्टअप कट्टा, आयडिया लॅब, इनोव्हेशन उपक्रम, पेटंटस, उद्योग सहकार्य आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भागीदारी यामुळे विद्यार्थ्यांना नवकल्पनांचे प्रत्यक्ष प्रयोग व त्यांचे उद्योगामध्ये रुपांतर करण्यासाठी सक्षम व्यासपीठ मिळाले असून अनेक विद्यार्थ्यांनी आपले स्टार्टअप्स रजिस्ट्रर केले आहेत.
या मानांकनासाठी संशोधन व विकास, उद्योजकता, स्टार्टअप्स, उद्योगाभिमुख शिक्षण, इंडस्ट्री सर्व्हिसेस व कन्सलटंन्सी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहकार्य, नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रशिक्षण, प्लेसमेंट आणि उद्योग संस्था संबंध अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला.
फोर स्टार रेटिंग संपूर्ण डीकेटीई परिवारासाठी अभिमानाची बाब असून, इनोव्हेशन आणि उद्योजकतेची संस्कृती अधिक सक्षम करण्यासाठी हे मानांकन प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थ्यांमध्ये युवा उजोकतेला चालना देवून स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणे हे संस्थेचे सातत्यपूर्ण ध्येय आहे असा विश्वास संस्थेच्या संचालिका डॉ एल.एस.आडमुठे यांनी यावेळी व्यक्त केला.
या रेटिंगसाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांचे मार्गदर्शन मिळाले. इन्स्टिटयूटचे डायरेक्टर, प्रा.डॉ एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, इन्सिटटयूटचे आयआयसी प्रेसिडंट डॉ.डी.व्ही. कोदवडे, समन्वयक डॉ. टी.आय.बागवान व सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,माजी विद्यार्थी यांचा या यशात मोलाचा वाटा आहे.