no images were found
अदाणी ग्रीन एनर्जीने बॅटरी स्टोरेज क्षमता 6.63 GWh पर्यंत वाढवली; भारतातील कार्यरत बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम क्षमतेपैकी 50% पेक्षा जास्त वाटा
- जगातील एकाच ठिकाणी असलेली सर्वात मोठी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (बीईएसएस)
अहमदाबाद,: भारतातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी असलेल्या, अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ने (एजीईएल), गुजरातमधील खावडा येथे कार्यरत बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (बीईएसएस) ची क्षमता 6.63 गिगावॅट-तास (GWh) पर्यंत वाढवली आहे. जून 2026 मध्ये ही क्षमता 3.55 GWh होती. भारतातील सुमारे 12.6 GWh कार्यरत बीईएसएस क्षमतेपैकी आता एजीईएलचा वाटा 50% पेक्षा जास्त आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे खावडा हे एकाच ठिकाणी कार्यरत असलेले जगातील सर्वात मोठे बॅटरी एनर्जी स्टोरेज केंद्र ठरले आहे. येथे 6.63 गिगावॅट-तास (GWh) क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (बीईएसएस) कार्यरत आहे.
गुजरातमधील खावडा येथे बीईएसएस चे बांधकाम सुरू केल्यानंतर अवघ्या 14 महिन्यांत एजीईएल ने 6.63 GWh क्षमतेचा टप्पा गाठला आहे. यातील नवीन क्षमता बांधकाम सुरू केल्यापासून केवळ 10 महिन्यांत कार्यान्वित करण्यात आली. खावडा येथे एजीईएलच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पासोबत बीईएसएस प्रकल्प जोडण्यात आला आहे. कंपनी येथे 538 चौरस किलोमीटर पसरलेल्या मोकळ्या आणि ओसाड जमिनीवर 30 GW क्षमतेचा अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करत आहे.
एजीईएलची 6.63 GWh बीईएसएस क्षमता दररोज सुमारे 20 लाख घरांना वीज पुरवण्यासाठी पुरेशी स्वच्छ ऊर्जा साठवू शकते. तसेच, नागपूर, पटणा किंवा विशाखापट्टणम (विझाग) यांसारख्या शहरांच्या वीजेच्या सर्वाधिक मागणीला काही तासांसाठी ही ऊर्जा पुरवता येऊ शकते. खावडा येथील ही बीईएसएस क्षमता 1.5 लाखांहून अधिक मध्यम आकाराच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) बॅटरी स्टोरेज क्षमतेइतकी आहे. तसेच, दररोज इतकी ऊर्जा साठवता येते की ती दिल्ली मेट्रोच्या अंदाजे दैनंदिन वीज गरजेच्या जवळपास दुप्पट गरज पूर्ण करू शकते. यावरून या प्रकल्पाचा मोठा विस्तार स्पष्ट होतो. 6.63 GWh पर्यंत क्षमता वाढवल्यामुळे अक्षय ऊर्जेचे वीज ग्रीडमध्ये एकत्रीकरण अधिक मजबूत झाले आहे. यामुळे स्वच्छ ऊर्जा साठवून गरजेनुसार तिचा वापर करता येतो.
अदाणी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक श्री. सागर अदाणी म्हणाले, “केवळ 14 महिन्यांत 6.63 GWh कार्यरत बॅटरी स्टोरेज क्षमता गाठणे ही एजीईएल आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वाची कामगिरी आहे. या क्षमतेमुळे वीज ग्रीडला गरज असताना अक्षय ऊर्जा अधिक स्थिर, विश्वासार्ह आणि मागणीनुसार उपलब्ध करून देता येते. भारतातील विजेची मागणी वाढत असताना, अधिक मजबूत आणि कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या वीज ग्रीडला मदत करण्यासाठी आम्ही बॅटरी स्टोरेज आणि पंप्ड स्टोरेज अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जा साठवणूक उपायांचा विस्तार करत राहू.”
प्रगत प्रकल्प नियंत्रण, डिजिटल मॉनिटरिंग सिस्टम, जलद आणि प्रभावी बांधकाम व्यवस्थापन पद्धती तसेच जगातील आघाडीच्या बीईएसएस उपकरण निर्मात्या कंपन्यांसोबत (OEMs) केलेल्या धोरणात्मक भागीदारीमुळे प्रकल्पाचे काम ठरलेल्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात आले. यासोबतच गुणवत्ता आणि सुरक्षेच्या कडक नियमांचेही पालन करण्यात आले. मोठ्या प्रमाणातील ऊर्जा साठवणूक प्रकल्प उभारणी आणि संचालनासाठी हा प्रकल्प एक आदर्श उदाहरण ठरला आहे. विश्वासार्ह आणि मोठ्या प्रमाणावर वापरता येणाऱ्या ऊर्जा साठवणूक सुविधांच्या माध्यमातून भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील बदलाला यामुळे मदत होत आहे.
या बीईएसएस मध्ये लिथियम-आयन बॅटरी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामध्ये एनर्जी मॅनेजमेंट सिस्टम (EMS) आणि स्वयंचलित टेलिमेट्री प्रणाली जोडण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे बॅटरी चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचे व्यवस्थापन, प्रणालीची कार्यक्षमता वाढवणे आणि वीज ग्रीडला आवश्यक सेवा देणे शक्य होते. बॅटरी स्टोरेजमुळे वीज ग्रीड अधिक स्थिर ठेवण्यास, विजेची सर्वाधिक मागणी असलेल्या वेळेचे व्यवस्थापन करण्यास, अतिरिक्त वीज वाया जाणे कमी करण्यास आणि गरजेनुसार अक्षय ऊर्जा उपलब्ध करून देण्यास मदत होते.
एजीईएल आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 10 GWh पेक्षा जास्त बीईएसएस (बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम)क्षमता वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. तसेच, पुढील 5 वर्षांत 50 GWh ऊर्जा साठवणूक क्षमता उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. मोठ्या प्रमाणावर स्थिर आणि गरजेनुसार उपलब्ध होणारी अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याच्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून कंपनी पंप्ड स्टोरेज प्रकल्प (PSP) उभारण्यावरही काम करत आहे.