Home Video स्वमन सामाजिक मानवाधिकार परिषदेचे कोल्हापुरात उद्घाटन. 

स्वमन सामाजिक मानवाधिकार परिषदेचे कोल्हापुरात उद्घाटन. 

39 second read
0
0
8

no images were found

स्वमन सामाजिक मानवाधिकार परिषदेचे कोल्हापुरात उद्घाटन.                                                                                            कोल्हापूर (प्रतिनिधी):- मानवी प्रतिष्ठा ,समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि मूलभूत अधिकार हे प्रत्येक नागरिकाचे जन्मसिद्ध हक्क आहेत .मानवी हक्कांची संरक्षण आणि त्याबाबत जनजागृती करणे ही केवळ शासनाची नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे . स्वमन सामाजिक मानवाधिकार परिषद या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यात मानवाधिकार जनजागृती व मार्गदर्शनाचे व्यापक अभि
यान सुरू करीत आहोत. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावांमध्ये शाखा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे .या शाखांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या हक्काची माहिती कायदेशीर प्रक्रिया, शासकीय योजना व विविध नागरी समस्या बाबत मार्गदर्शन केली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या समस्या केवळ तक्रार म्हणून न मांडता कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने त्या स्वतः कशा सोडवता येतील, याबाबत नियमित मार्गदर्शन देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे .विशेषतः डॉक्टर, वकील, शिक्षक ,महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि मानवाधिकार विषयात काम करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावी असे आम्ही आवाहन करीत आहोत. ानवाधिकार्‍यांचे उल्लंघन होत असल्यास त्याची माहिती परिषदेकडे मांडता येईल. संबंधित प्रकरणांमध्ये उपलब्ध कायदेशीर व प्रशासकीय वर्गाची माहिती देऊन नागरिकांना योग्य ती मार्गदर्शन केले जाईल .हक्कांची जाणीव ठेवा, अन्यायविरुद्ध कायदेशीर मार्गाने आवाज उठवा आणि आपल्या समस्यांचे समाधान स्वतःच सहभागातून मिळवा असे आमचे आवाहन आहे .कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हाvee आणि आमच्या शाहू स्टेडियम पहिला मजला गोखले कॉलेज रोड डॉक्टर राणी हॉस्पिटल समोर कोल्हापूर येथे असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सोमान सामाजिक मानवाधिकार परिषदेतर्फे करण्यात आले यावेळी एड.नारायण पवार ,श्री पारस ओसवाल, उदय चौगुले ,पुनम मोरे ,मिलिंद कुलकर्णी आधी उपस्थित होते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई

कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई कोल्हापूर, : कोल्हापू…