Home Video कोल्हापुरात रविवारी जीप फोर बाय फोरऑफ रोडींग चा थरार.        

कोल्हापुरात रविवारी जीप फोर बाय फोरऑफ रोडींग चा थरार.        

1 min read
0
0
16

no images were found

कोल्हापुरात रविवारी जीप फोर बाय फोरऑफ रोडींग चा थरार.                                                                                                 कोल्हापूर (प्रतिनिधी):- पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांच्या पसंतीस उतरलेलल्या  आजारीज इको व्हॅली येथे रविवारी दिनांक चार रोजी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब च्या वतीने जीपच्या ऑफ रोडींग स्पर्धेचे आयोजन केले ची माहिती डॉ.नचिकेत पाटील यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.              ते म्हणाले पश्चिम घाटापैकी महत्त्वाचे असलेल्या गगनबाडा विसरत येते निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गाला हानी न पोहोचता आजारीज इको व्हॅलीची उभारणी केली आहे. या पर्यटन केंद्राला पर्यटकांनी मोठी पसंती दिली आहे स्पर्धेचे नियोजन फोर बाय फोर कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीची खेळाडू अश्विन शिंदे करत असून ते म्हणाले की रविवारी एक दिवस होणाऱ्या फोर बाय फोर ऑफ रोडींग फॅमिली इव्हेंट मध्ये एकूण 200 लोक सहभागी होतील. यामध्ये ग्रुप ड्राईव्ह, ट्रायल ड्राईव्ह,फॅमिली ड्राईव्ह झाल्यानंतर टाईम ट्रायल ही स्पर्धा घेतली जाणार आहे.                                                                                                       
यासाठी कोल्हापूर ,सांगली ,कराड, सातारा, पुणे ,मुंबई, नाशिक, गोवा ,कर्नाटक येथील स्पर्धक सहभागी होणार आहेत. सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याकरिता शिवाजीराव मोहिते आणि रोड टू लंडन ही सेल्फ ड्राईव्ह मोहीम पूर्ण केलेले हेमंत शहा तसेच बरेच अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित ऑफ रोडरही उपस्थित राहणार आहेत. पर्यटन ,स्थानिकांना प्रोत्साहन आणि नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण व मदत अशा दुहेरी हेतूने होणाऱ्या या स्पर्धा होतील .विजेत्यांना मेडल ,ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात येणार आहे.                                                                             दरम्यान यावेळी स्पर्धेचे टी-शर्ट चे अनावरण चितेश मुंडोरी, डॉ. नचिकेत पाटील ,ऑफ रोडरअश्विन शिंदे ,कुणाल धुम्मा, दिग्विजय लोळगे ,राकेश जाधव आणि बाईक रायडर प्रशांत काशीद आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई

कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई कोल्हापूर, : कोल्हापू…