Home स्पोर्ट्स ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

1 second read
0
0
9

no images were found

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

कोल्हापूर,: पारंपरिक व देशी खेळांना जागतिक व्यासपीठावर प्रोत्साहन देणे, क्रीडा सहभाग वाढविणे तसेच भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 या कार्यक्रमाचे आयोजन 12 ऑक्टोबर रोजी वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अहमदाबाद, गुजरात येथे करण्यात आले आहे. विभागातील पात्र खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन निवड चाचणीस उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सुहास पाटील यांनी केले आहे.

या आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवामध्ये योगासन खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्याचा मान महाराष्ट्र राज्याला प्राप्त झाला आहे. या प्रात्यक्षिकासाठी महाराष्ट्र राज्यातून खुल्या गटातील 15 खेळाडूंची अंतिम निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष निवड चाचणी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी-महाळुंगे, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

या निवड चाचणीसाठी खेलो इंडिया युथ गेम्स, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स यापैकी कोणत्याही एका स्पर्धेत पदक प्राप्त केलेले खेळाडू पात्र राहतील. तसेच 2026-27 या वर्षातील वरिष्ठ गट राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेले व संघटनेमार्फत नामनिर्देशित 10 खेळाडू देखील पात्र राहतील. पात्र खेळाडूंनी निवड चाचणीस उपस्थित राहताना मूळ क्रीडा प्रमाणपत्रे व आधारकार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप

डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप कोल्हापूर (प्रतिनिधी):- श…