Home विमा आयसीआयसीआय प्रु गोल्ड पेन्शन सेव्हिंग्ज सोबत स्वतःच्या अटींवर निवृत्तीचे नियोजन: आयुष्यभर आर्थिक स्वातंत्र्याकडे वाढता कल

आयसीआयसीआय प्रु गोल्ड पेन्शन सेव्हिंग्ज सोबत स्वतःच्या अटींवर निवृत्तीचे नियोजन: आयुष्यभर आर्थिक स्वातंत्र्याकडे वाढता कल

8 second read
0
0
6

no images were found

आयसीआयसीआय प्रु गोल्ड पेन्शन सेव्हिंग्ज सोबत स्वतःच्या अटींवर निवृत्तीचे नियोजन: आयुष्यभर आर्थिक स्वातंत्र्याकडे वाढता कल

मुंबई : भारताच्या लोकसंख्येत वेगाने बदल होत आहेत. आज भारत तरुण देश म्हणून ओळखले जात असला, तरी देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या अंदाजानुसार, 2036 पर्यंत भारतातील प्रत्येक सातपैकी एक व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल आणि त्यांची संख्या वाढून सुमारे 23 कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे.

लोकांचे आयुर्मान वाढत आहे आणि निवृत्तीनंतर मुलांवर किंवा कुटुंबावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची पारंपरिक पद्धतही बदलत आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी आधीपासून आर्थिक नियोजन करणे आता केवळ पर्याय राहिलेला नाही, तर काळाची गरज बनली आहे.

ही गरज लक्षात घेऊन आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आयसीआयसीआय प्रु गोल्ड पेन्शन सेव्हिंग्ज ही बोनस-लिंक्ड पेन्शन योजना सुरू केली आहे. ही योजना सुरक्षितता आणि लवचिकता लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या योजनेद्वारे ग्राहक निवृत्तीसाठी चांगला पेन्शन निधी तयार करू शकतात. यामध्ये गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते. तसेच आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी किंवा आजारपणाच्या वेळी अंशतः रक्कम काढण्याची सुविधाही मिळते. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित राहण्यास मदत होते.

याबाबत श्री.विकास गुप्ता, चीफ प्रॉडक्ट ऑफिसर, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणाले, “ आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ मध्ये आमचा विश्वास आहे की, निवृत्तीचा काळ हा आनंदाचा असावा, आर्थिक तणावाचा नाही. आयसीआयसीआय प्रु गोल्ड पेन्शन सेव्हिंग्ज ही योजना ग्राहकांना गुंतवलेल्या रकमेचे संरक्षण, बोनसद्वारे निधी वाढवण्याची संधी आणि आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी किंवा आजारपणासारख्या अनिश्चित प्रसंगी गरज भासल्यास पैसे काढण्याची सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत आपत्कालीन गरजांसाठी निधीच्या 25% पर्यंत रक्कम काढण्याची सुविधा आहे. त्यामुळे ग्राहक नोकरीच्या काळात नियमित बचत करून निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, स्वाभिमानी आणि आत्मविश्वासाने जीवन जगू शकतात. तसेच त्यांच्या गरजा आणि स्वप्नेही पूर्ण करू शकतात. याशिवाय, या योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी आणि आरोग्य व्यवस्थापन आणि वेलनेसशी संबंधित सेवांचाही लाभ मिळतो. त्यामुळे निवृत्तीचे नियोजन करणाऱ्यांसाठी ही योजना अधिक उपयुक्त ठरते.”

ही योजना कशी काम करते, हे एका उदाहरणातून समजून घेऊया. समजा, प्रतीक नावाचा 40 वर्षांचा नोकरी करणारा व्यक्ती आहे. त्याने 10 वर्षे दरवर्षी 1.5 लाख रुपये या योजनेत गुंतवले. जर त्याला वर्षाला 8% परतावा मिळाला, तर वयाच्या 60व्या वर्षी त्याच्याकडे सुमारे ₹44 लाखांचा निवृत्ती निधी तयार होऊ शकतो. तसेच, 4% वार्षिक परतावा गृहीत धरल्यास 25 लाख रुपयांचा निधी जमा होऊ शकतो. या योजनेअंतर्गत तो या निधीपैकी 60% रक्कम करमुक्त एकरकमी काढू शकतो. या पैशांचा वापर तो प्रवास, घराचे नूतनीकरण किंवा इतर महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतो. उर्वरित रक्कम वापरून तो अॅन्युइटी (नियमित पेन्शन) योजना खरेदी करू शकतो. त्यामुळे त्याला आयुष्यभर हमीसह नियमित उत्पन्न मिळत राहते आणि निवृत्तीनंतरही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहण्यास मदत होते.

एकूणच, आयसीआयसीआय प्रु गोल्ड पेन्शन सेव्हिंग्ज ही योजना गुंतवलेल्या रकमेचे संरक्षण, बोनसच्या माध्यमातून निधीत वाढ आणि गरज पडल्यास 25% पर्यंत आपत्कालीन पैसे काढण्याची सुविधा देऊन निवृत्तीचे नियोजन अधिक सुरक्षित आणि सोपे बनवते. याशिवाय, या योजनेत मोफत आरोग्य तपासणी तसेच मुदतपूर्तीवेळी करमुक्त रक्कम काढण्याची सुविधाही मिळते. त्यामुळे ग्राहकांना निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहण्यास, सुरक्षित भविष्य घडविण्यास आणि आर्थिक चिंतेशिवाय आनंदी व निवांत आयुष्य जगण्यास मदत होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In विमा
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठाचा इन्फ्राप्लान समुहासमवेत सामंजस्य करार: जलविद्याविषयक संशोधनाला गती मिळणार

शिवाजी विद्यापीठाचा इन्फ्राप्लान समुहासमवेत सामंजस्य करार: जलविद्याविषयक संशोधनाला गती मिळ…