Home Video केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर दोन दिवसात बैठक घेवून गणेशोत्सवापूर्वी सकारात्मक निर्णय घ्या : परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांनी घेतली उपायुक्त पारितोष कंकाळ यांची भेट

केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर दोन दिवसात बैठक घेवून गणेशोत्सवापूर्वी सकारात्मक निर्णय घ्या : परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांनी घेतली उपायुक्त पारितोष कंकाळ यांची भेट

6 second read
0
0
8

no images were found

केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर दोन दिवसात बैठक घेवून गणेशोत्सवापूर्वी सकारात्मक निर्णय घ्या : परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांनी घेतली उपायुक्त पारितोष कंकाळ यांची भेट

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील (केएमटी) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाने सकाराfत्मक भूमिका घेतली असून, या प्रश्नांवर तातडीने बैठक घेऊन योग्य तो निर्णय करण्यात येईल, अशी माहिती मनपा उपायुक्त पारितोष कंकाळ यांनी दिली.

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांनी आज उपायुक्त पारितोष कंकाळ यांची भेट घेऊन केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये मान्यताप्राप्त कामगार संघटनेसोबत झालेल्या बैठकीतील निर्णय व ठरावांची अंमलबजावणी करणे, महासभेने मंजूर केलेल्या रोजंदार कर्मचाऱ्यांना प्रलंबित वेतनवाढ लागू करून वेतन फरकाची थकबाकी अदा करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करून त्याचा फरक देणे, पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची कार्यवाही करणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे तसेच सेवानिवृत्ती उपदानासह इतर प्रलंबित सेवा विषयक मागण्यांचा समावेश आहे.

या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्याची गरज असल्याचे रोहन अतिग्रे यांनी उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. केएमटी कर्मचारी हे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांचे निराकरण झाल्यास कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

यावेळी उपायुक्त पारितोष कंकाळ यांनी केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असून, संबंधित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्नांवर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. प्रलंबित मागण्यांचा आवश्यक त्या पद्धतीने आढावा घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे,व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष अमर क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

पारादीप बंदरात एपीएसईझेड ची एंट्री, कंपनी 18 एमएमटी ची नवीन क्षमता वाढवणार

पारादीप बंदरात एपीएसईझेड ची एंट्री, कंपनी 18 एमएमटी ची नवीन क्षमता वाढवणार संपादकीय सारांश…