Home Video अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

42 second read
0
0
10

no images were found

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

  • नव्याने सुरू करण्यात आलेल्या यूव्ही स्पेस स्टेशनद्वारे आता कोल्हापूरमध्ये X-47 क्रॉसओव्हर आणि F77s विक्रीसाठी उपलब्ध.
  • कोल्हापूरमधील यूव्ही स्पेस स्टेशनच्या उद्घाटनामुळे अल्ट्राव्हायोलेटचे देशभरातील स्थान अधिक विस्तारले असून आता कंपनीने देशातील 35 शहरांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.
  • ग्राहकांसाठी सर्वसमावेशक अनुभव: ग्राहकांच्या संपूर्ण प्रवासातील सर्व गरजा पूर्ण करत उत्साही रायडर्सना ब्रँडचा समृद्ध आणि अनुभवात्मक परिचय देणारे केंद्र.
  • वैयक्तिकृत टेस्ट राईड्स आणि सेवा: एक्स्पिरियन्स सेंटरमध्ये ग्राहकांसाठी सानुकूलित टेस्ट राईड्स, समर्पित सेवा सहाय्य तसेच अस्सल स्पेअर पार्ट्सची उपलब्धता.

 कोल्हापूर, – अल्ट्राव्हायोलेटने आज कोल्हापूरमध्ये आपल्या नवीन यूव्ही स्पेस स्टेशनच्या उद्घाटनाची घोषणा केली असून देशभरातील आपल्या रिटेल आणि सेवा नेटवर्कच्या विस्तारात महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. हा विस्तार कंपनीने अलीकडेच साध्य केलेल्या अनेक महत्त्वाच्या टप्प्यांनंतर करण्यात आला आहे. यामध्ये देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘किल द पेट्रोल बिल’ हा कार्यक्रम, भारतभरातील टाईप 6 चार्जिंग नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी Bolt.Earth सोबतच्या सहकार्याची घोषणा आणि ‘Battery Flex’ (BaaS) कार्यक्रम यांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांमधून अल्ट्राव्हायोलेटचा सर्वसमावेशक इलेक्ट्रिक दळणवळण परिसंस्था उभारण्यावरील भर दिसून येतो. या नवीन एक्स्पिरियन्स सेंटरमुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना कंपनीच्या उच्च-कार्यक्षमता असलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्स अधिक सुलभपणे उपलब्ध होतील आणि देशभरातील कंपनीचे वाढते स्थान आणखी मजबूत होईल.

    डीलर एम/एस. आहुजा मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या भागीदारीत स्थापन करण्यात आलेले हे नवीन यूव्ही स्पेस स्टेशन ग्राहकांना अल्ट्राव्हायोलेटच्या उच्च-कार्यक्षमता असलेल्या X-47 क्रॉसओव्हर आणि F77s या मोटरसायकलींचा सर्वसमावेशक अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देईल. यूव्ही स्पेस स्टेशन हे 3S सुविधाकेंद्र असून ग्राहकांना टेस्ट राईडपासून विक्री, सेवा, विविध मोटरसायकल अॅक्सेसरीज आणि मर्चेंडाइजपर्यंतचा समृद्ध अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या उत्पादनांमध्ये 40.2 hp क्षमतेचे पॉवरट्रेन आणि 100 Nm टॉर्क असून, ती केवळ 2.8 सेकंदांत 0 ते 60 kph वेग गाठू शकतात. 10.3 kWh क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज असलेल्या या मोटरसायकली एका चार्जमध्ये 323 किमी इतकी IDC रेंज देतात.

    या उद्घाटनाबाबत बोलताना अल्ट्राव्हायोलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक नारायण सुब्रमण्यम म्हणाले, कोल्हापूरची ओळख नेहमीच अभियांत्रिकीतील उत्कृष्टताउत्पादन क्षमता आणि समृद्ध ऑटोमोटिव्ह संस्कृतीशी जोडलेली राहिली आहे. भारतातील महत्त्वाच्या ऑटो कॉम्पोनंट (वाहनांसाठी लागणारे घटक) उत्पादन केंद्रांपैकी एक असलेले हे शहर नाविन्यपूर्णतेचा आग्रह धरते. अल्ट्राव्हायोलेटच्या तत्त्वज्ञानाशी हे अत्यंत सुसंगत आहे. आमच्या नवीन यूव्ही स्पेस स्टेशनच्या उद्घाटनाद्वारे आम्ही कोल्हापूरमध्ये अल्ट्राव्हायोलेटचा संपूर्ण स्वतःच्या मालकीची गाडी असण्याचा हक्काचा अनुभव घेऊन येत आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञानउच्च-कार्यक्षमता असलेल्या मोटरसायकलींची श्रेणी आणि सर्वसमावेशक विक्रीपश्चात सेवा सहाय्य हे सर्व एका ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. कोल्हापूरच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्राचा भाग बनण्यास आणि येथील मोटरसायकलप्रेमींचे अल्ट्राव्हायोलेट परिवारात स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

    प्रगत इलेक्ट्रिक दळणवळण सुविधा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या अल्ट्राव्हायोलेटच्या बांधिलकीनुसार, कंपनीने अलीकडेच ‘किल द पेट्रोल बिल’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत, अल्ट्राव्हायोलेट F77 किंवा X-47 खरेदीसाठी अपग्रेड करणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला त्यांच्या मागील दुचाकीवर गेल्या 2 वर्षांत केलेल्या किलोमीटर प्रवासाच्या समतुल्य कॅशबॅक मिळेल. या योजनेअंतर्गत, ग्राहक त्यांच्या रायडिंग इतिहास आणि वाहनाच्या वापराच्या आधारे अल्ट्राव्हायोलेट मोटरसायकल खरेदीवर 30,000 रु. पर्यंतचे लाभ मिळवू शकतात. आधीपासूनच पेट्रोलवर केलेल्या प्रवासातील किलोमीटरचे रूपांतर मालकी हक्काशी संबंधित लाभांमध्ये करून अल्ट्राव्हायोलेट इलेक्ट्रिक मोबिलिटीचा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा अधोरेखित करत आहे.  म्हणजेच कार्यक्षमता, तंत्रज्ञान, विश्वासार्हता किंवा रायडिंग अनुभवाशी कोणतीही तडजोड न करता इंधनावरील वारंवार होणाऱ्या खर्चापासून मिळणारे स्वातंत्र्य ते अनुभवायला देत आहेत.

   महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील यूव्ही स्पेस स्टेशनचा पत्ता: CTS. No. 453, B/6, द फर्न हॉटेल शेजारी, स्टेशन रोड, श्री शाहू मार्केट यार्डसमोर, कोल्हापूर, महाराष्ट्र 416005

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

वसंतराव दत्तवाडे यांच्याकडून मर्यादित साधनांतून अमर्याद पत्रकारितेचा आदर्श: प्रसाद कुलकर्णी

वसंतराव दत्तवाडे यांच्याकडून मर्यादित साधनांतून अमर्याद पत्रकारितेचा आदर्श: प्रसाद कुलकर्ण…