Home उद्योग ‘अदाणी कॉपर’ ग्रेड-ए कॅथोड्ससाठी मिळाली लंडन मेटल एक्स्चेंज ब्रँड नोंदणी

‘अदाणी कॉपर’ ग्रेड-ए कॅथोड्ससाठी मिळाली लंडन मेटल एक्स्चेंज ब्रँड नोंदणी

2 second read
0
0
5

no images were found

‘अदाणी कॉपर’ ग्रेड-ए कॅथोड्ससाठी मिळाली लंडन मेटल एक्स्चेंज ब्रँड नोंदणी

अहमदाबाद,: अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) ची उपकंपनी असलेल्या कच्छ कॉपर लिमिटेड (केसीएल) ला ‘अदाणी कॉपर’साठी लंडन मेटल एक्स्चेंज (एलएमई) चे प्रमाणन प्राप्त झाले आहे. औद्योगिक धातूंच्या व्यापारासाठी जागतिक स्तरावरील प्रमुख केंद्र असलेल्या एलएमई कडून मिळालेली ही मान्यता केसीएल च्या उत्पादनातील उत्कृष्टता आणि जबाबदार स्रोत व्यवस्थापन पद्धतींना कठोर जागतिक निकषांवर मान्यता देते. यामुळे १० जुलै २०२६ पासून एलएमई कॉपर फ्युचर्स करारांअंतर्गत वॉरंट जारी करण्यासाठी पात्र असलेले अदाणी कॉपर कॅथोड्स वितरित करता येणार आहेत.

अदाणी समूहासाठी, ‘कॉपर ग्रेड ए’ करारांसाठी गुड डिलिव्हरी ब्रँड म्हणून एलएमई कडून मिळालेली ही नोंदणी अदाणी कॉपरला जगातील आघाडीच्या कॉपर ब्रँड्सच्या श्रेणीत स्थान देते. यामुळे धातू क्षेत्रातील अदाणी समूहाच्या प्रवेशाला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि बाजारातील विश्वासार्हता प्राप्त झाली असून, परिष्कृत तांब्याचा जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक उत्पादक म्हणून समूहाचा उदय अधिक बळकट झाला आहे.

याबाबत डॉ. विनय प्रकाश, मुख्य कार्यकारी अधिकारी – नॅचरल रिसोर्सेस, अदाणी एंटरप्रायझेस आणि व्यवस्थापकीय संचालक, कच्छ कॉपर लिमिटेड म्हणाले, “कॉपर हा जागतिक ऊर्जा संक्रमणाचा कणा आहे. एलएमई ब्रँड दर्जा प्राप्त करणे म्हणजे अदाणीची जगातील अग्रगण्य कॉपर उत्पादकांमध्ये गणना होणे आणि या महत्त्वपूर्ण धातूसाठी सक्षम, जबाबदार पुरवठा साखळी उभारण्यात भारताची भूमिका अधिक मजबूत होणे होय. कच्छ कॉपरची जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आणि ईएसजी मानके लक्षात घेता ही मान्यता अत्यंत योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी मिळाली आहे. यामुळे अदाणी कॉपरला जागतिक स्तरावर अधिक स्वीकार्यता मिळेल. आंतरराष्ट्रीय धातू उद्योगात भारताची वाढती प्रतिष्ठा अधिक दृढ करण्यासोबतच, परिष्कृत तांब्याच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी ही नोंदणी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”

एलएमई ब्रँड प्रमाणन ही अत्यंत कठोर प्रक्रिया असून त्यामध्ये रासायनिक संरचना, आकार आणि वजन यांसारख्या गुणवत्ता निकषांसह जबाबदार स्रोत व्यवस्थापनाशी संबंधित कठोर प्रोटोकॉलचे पालन करावे लागते. एलएमई सूचीकरणामुळे पात्र अदाणी कॉपर कॅथोड्सना एलएमई-मान्यताप्राप्त गोदामांमध्ये वॉरंट अंतर्गत ठेवता येणार असून, एलएमई सूचीबद्ध धातूला उच्च तरलता असलेली मालमत्ता म्हणून मान्यता

 

असल्यामुळे त्याचा तारण म्हणून वापर करून वित्तपुरवठ्याची अधिक लवचिकता मिळते. तसेच, एलएमई साठी अदाणी कॉपरचा समावेश हा एका महत्त्वाच्या नव्या उत्पादन केंद्रातून उच्च दर्जाचे कॅथोड उपलब्ध करून देत जागतिक कॉपर बाजारातील वितरण क्षमता, तरलता आणि भौगोलिक विविधता अधिक मजबूत करेल.

यूएसडी १.२ अब्ज गुंतवणुकीत उभारलेला कच्छ कॉपर प्रकल्प, ०.५ दशलक्ष टन वार्षिक उत्पादन क्षमतेसह, जगातील सर्वात मोठ्या एकाच ठिकाणी उभारलेल्या कस्टम कॉपर स्मेल्टिंग संकुलांपैकी एक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत प्रक्रिया स्वयंचलन आणि शाश्वततेवर आधारित डिझाइन तत्त्वांनुसार विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प देशांतर्गत कॉपर पुरवठा मजबूत करेल, आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करेल आणि विद्युतीकरण, अक्षय ऊर्जा तसेच ऊर्जा संक्रमणासाठी अत्यावश्यक असलेल्या या धातूच्या क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला अधिक बळकटी देईल.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

पद्मश्री डॉ. एच. सी. वर्मा यांचे गुरुवारी शिवाजी विद्यापीठात विशेष व्याख्यान

पद्मश्री डॉ. एच. सी. वर्मा यांचे गुरुवारी शिवाजी विद्यापीठात विशेष व्याख्यान कोल्हापूर,: प…