Home रोजगार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे रोजगार मेळावा संपन्न

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे रोजगार मेळावा संपन्न

5 second read
0
0
9

no images were found

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे रोजगार मेळावा संपन्न

कोल्हापूर  :  येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत डी .वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (कसबा बावडा) या ठिकाणी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातर्गंत (TPO – HR Meet) हा कार्यक्रम पार पडला .
यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम ,कॅम्पस संचालक अभिजीत माने , युवा शक्ती स्किल इंडिया प्रा.लि चे संचालक डॉ सतीश पवार, ज्येष्ठ उद्योजक शाम तोतला , अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. डी चेडे , जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष संजय पेंडसे , बालाजी बिराजदार आदी उपस्थित होते. 
यावेळी मार्गदर्शन करताना श्री चेळे म्हणाले , युवकांनी स्वतःच्या क्षमता ओळखून संबंधित शाखेच्या अभ्यासक्रमाची निवड करावी जेणेकरून रोजगार प्राप्तीला सहाय्य होईल तसेच रोजगारामध्ये अधिक कौशल्य शोधण्याचा प्रयत्न प्रशिक्षणार्थीने करावा .अभिजीत माने म्हणाले, उद्योग क्षेत्रात कोणत्या रोजगाराची संधी उपलब्ध आहे याचा शोध इंजिनिअरिंग कॉलेजनी घेऊन त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना करावी तर डॉ . सतीश पवार बोलताना म्हणाले ,युवा शक्ती स्किल इंडिया प्रा .लि द्वारे आत्तापर्यंत सुमारे 40 हजार युवकांना रोजगार दिला आहे .युवकांना रोजगारक्षम तयार करण्याचे कार्य युवा शक्ती स्किल इंडिया करते .एच आर प्रतिनिधी संग्राम देशमुख यांनी, या रोजगार मेळावाबाबत पालकांचे प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी, शासन धोरण व युवक कौशल्य यांचा समन्वय साधून भविष्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतील असे सांगितले .या कार्यक्रमासाठी जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी वाय .बी पाटील , मकरंद काईंगडे , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री आवटे यांच्यासह विविध HR प्रतिनिधी , प्रशिक्षण व नियुक्त अधिकारी (TPO), प्राध्यापक उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षाधिन सहाय्यक आयुक्त सारंग कापूरकर तर सूत्रसंचालन नेहा जाधव व आभार प्रदर्शन सुदर्शन सुतार यांनी केले .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In रोजगार
Comments are closed.

Check Also

१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार

१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार :डी. वाय. पाटील …