Home रोजगार ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

30 second read
0
0
10

no images were found

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 कोल्हापूर, : ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर एकूण 17 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रधानमंत्री महोदयांच्या संकल्पनेनुसार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र” हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

       या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे हा आहे. विविध औद्योगिक आस्थापना, उद्योग, कंपन्या व नियोक्त्यांकडील उपलब्ध रिक्त पदांची माहिती संकलित करून त्यांच्या मनुष्यबळाच्या आवश्यकतेनुसार पात्र व कौशल्यधारक रोजगार इच्छुक उमेदवार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

       29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अॅड मॅनेजमेंट, कोल्हापूर, ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरोळ, आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ स्किल करिअर रिसर्च सेंटर, कोडोली,आयटीआय स्मॅक, पी. 12, पोलीस स्टेशन समोर, MIDC शिरोली, संजय घोडावत खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अतिग्रे, तांबवे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था, कागल, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तांबवे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था, पेठ वडगाव, म.ह. शिंदे महाविद्यालय, तिसंगी, परमवीरचक्र विजेते रामा राघोबा राणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राधानगरी, स्वरगंधर्व सुधीर फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुर्केवाडी, चंदगड, भटके विमुक्त विकास परिषद, कोल्हापूर (सामाजिक न्यायभवन सभागृह, सहायक आयुक्त, समाज कल्याण, बाबर हॉस्पिटल जवळ, विचारे माळ, कोल्हापूर) हुतात्मा वारके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुदरगड, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (गोशिमा), शिवराज कॉलेज, गडहिंग्लज, शरद कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, जैनापूर

     या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलसह गुगल फॉर्म – https://forms.gle/vBTzRQKYBBuBT४em७ या लिंकवर नोंदणी करावी. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 21 ते 24 सप्टेंबर पर्यंत जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये Soft Skill Interview Technique बाबतच्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.

    तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक आस्थापना, कंपन्या, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, उद्योग संघटना, विद्यापीठे, महाविद्यालये, तंत्रनिकेतने व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनीही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.

    कौशल्याला रोजगाराची जोड आणि युवकांना रोजगाराची संधी या उद्देशाने आयोजित करण्यात येत असलेल्या या रोजगार महाकुंभच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (Resume) तीन प्रती सोबत आणाव्यात.

 अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर, शासकीय निवासस्थान, सी बिल्डींग, विचारे माळ, कोल्हापूर -416004 येथे प्रत्यक्ष अथवा 0231-2545677 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

(नोंदणीसाठी QR Code स्कॅन करा)

गुगल फॉर्म:-https://forms.gle/vBTzRQKYBBuBT४em७

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In रोजगार
Comments are closed.

Check Also

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भार…