Home रोजगार आयटीआयमध्ये शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

आयटीआयमध्ये शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

1 min read
0
0
9

no images were found

आयटीआयमध्ये शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

              कोल्हापूर,  : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 18 जुलै रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

            या रोजगार मेळाव्यामध्ये 14 खाजगी उद्योजकांकडून 568 पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत.  या पदांकरीता किमान 8 वी, 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा, बी.टेक तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. तसेच स्वयंरोजगार करू इच्छ‍िणाऱ्या उमेदवारांकरीता व‍िव‍िध प्रकारची महामंडळे उदा. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर व इतर महामंडळे माह‍िती देण्यासाठी उपस्थ‍ित राहणार आहेत.

            इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.i‍n आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 3  प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.  जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In रोजगार
Comments are closed.

Check Also

जिल्ह्यात प्रथमच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची तिमाही बैठक;आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यावर भर

जिल्ह्यात प्रथमच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची तिमाही बैठक;आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण…