no images were found
पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे
कोल्हापूर(प्रतिनिधी): जयसिंगपूर येथील पद्मजा नांद्रे या महिला आपल्या कुटुंबीयांसह कोल्हापूरहून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी दाखल झाल्या होत्या. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. प्रत्यारोपणाची आवश्यकता भासल्यास त्यांच्या मुलीची, संभाव्य जिवंत यकृतदाता म्हणून तपासणी करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रियेची वेळ जवळ आलेली असताना, त्यांच्या वैद्यकीय अहवालांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांमुळे डॉक्टरांनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय स्थगित केला. त्यानंतर रूग्णाच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा होत गेली. यकृत प्रत्योरोपण शस्त्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र अपोलो हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांचे बारकाईने लक्ष, तत्पर आणि अत्याधुनिक उपचार यामुळे रूग्णावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याची वेळच आली नाही.
त्या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच रुग्णाचे यकृत झाले पूर्ववत बरे झाले असल्याची माहिती अंतरंग हॉस्पिटलचे डॉ.विवेकानंद कुलकर्णी आणि डॉ. आदित्य कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पद्मजा यांना सुरुवातीला तीव्र यकृत निकामी होण्याच्या समस्येमुळं कोल्हापूरातील अंतरंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतरही अपेक्षित सुधारणा होत नसल्याने, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पद्मजा यांना विशेष यकृत उपचार आणि प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे ओळखले आणि तातडीने पद्मज्ञा यांना नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलकडे संदर्भित केले. अंतरंग हॉस्पिटलमधील डॉ. आदित्य कुलकर्णी, यांनी पद्मजा यांची त्यावेळची परिस्थिती स्पष्ट केली. पद्मजा अंतरंग हॉस्पिटलमध्ये आल्या, तेव्हा त्यांच्या यकृताच्या कार्यक्षमतेत झपाट्याने होणारी घसरण ही चिंतेची बाब होती. त्यांना स्थानिक पातळीवरील उपचारांपेक्षा अधिक विशेष उपचारांची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. रुग्णाची गंभीर स्थिती आणि तातडीने प्रत्यारोपणाच्या स्तरावरील उपचार होण्यासाठी पद्मजा यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण प्रत्यारोपणाची गरज भासल्यास, अपोलो हॉस्पिटलमध्ये रूग्णाला अत्याधुनिक अतिदक्षता उपचार मिळतील आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यानुसार नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये पद्मजा यांना दाखल – करण्यात आले. यकृत प्रत्यारोपण आणि अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. प्रत्यारोपणासंदर्भात कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात आले, तर पद्मजा यांच्या मुलीची संभाव्य यकृतदाता म्हणून तपासणी करण्यात आली.
अपोलो हॉस्पिटलमध्ये सर्जरी हेड डॉ. गुरुप्रसाद शेट्टी रूग्णावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते. प्रत्यारोपणाची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतरही, नियोजित शस्त्रक्रियेच्या अगदी आधीपर्यंत, पद्मजा यांच्या ताज्या वैद्यकीय अहवालांचा आढावा घेतला असता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसताच, तातडीने शस्त्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या गंभीर कालावधीत अपोलो हॉस्पिटलमधून विशेष यकृत उपचार आणि अतिदक्षता सेवा देण्यात आली. त्यामध्ये प्लाझ्मा एक्सचेंजच्या अनेक सत्रांचाही समावेश होता. अपोलो हॉस्पिटलमधील क्रिटिकल केअरचे तज्ञ डॉ. सुवदीप सेन यांनीही या केसबद्दल माहिती दिली. बारकाईने निरीक्षण करणे आणि यकृताची कार्यक्षमता कमी होताना निर्माण होणारी गुंतागुंत टाळणे, यावर हॉस्पिटलचा मुख्य भर होता. पण पद्मजा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेल्याने, अखेर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे हेपॅटोलॉजी तज्ञ डॉ. अमेय सोनवणे म्हणाले, यकृत निकामी होण्याची स्थिती वेगाने बदलू शकते आणि काही तासांच्या कालावधीत रुग्णाची वैद्यकीय स्थिती बदलू शकते. पद्मजा यांना अंतरंग हॉस्पिटलमधून वेळेवर अपोलो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. जिथे अत्याधुनिक अतिदक्षता उपचार आणि यकृत प्रत्यारोपण या दोन्ही सुविधा उपलब्ध होत्या. रुग्ण पद्मजा नांद्रे यांनी देखील आता मला कोणताही त्रास होत नसल्याचे सांगत या उपचार पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले.