Home Uncategorized दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

48 second read
0
0
6

no images were found

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉराजेंद्र भारुड

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजमाता जिजाबाई हायस्कूलमधील इयत्ता १० वी SSC बोर्ड परीक्षा, इयत्ता ९ वी BDS तसेच इयत्ता ८ वी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.

            यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दृढ इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर विद्यार्थ्यांना यशाची शिखरे गाठावीत. अपयशाला घाबरू नका सातत्याने प्रयत्न करत राहा असे आवाहन केले. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या यशासाठी परिश्रम घेणारे शिक्षक आणि पालक यांचेही त्यांनी कौतुक केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक राजेश धोंगडे यांनी केले. विद्यार्थिनी स्वरांजली चौगले व गार्गी चित्रगार, तसेच नगरसेवक प्रतापसिंह जाधव आणि माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वाती खाडे-पाटील यांनी केले, तर आभार प्रवीण भलेकर यांनी मानले.

            यावेळी उपायुक्त किरणकुमार धनवडे, के.एम.सी.कॉलेजचे प्राचार्य नागांवकर, माजी मुख्याध्यापक अंजली जाधव, माजी शिक्षक तानाजी डवंग, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधुरी बारटक्के, शिक्षक राजनंदिनी हवालदार, शरयू अवसरे, शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदन जाधव, सौरभ बाचणकर यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन मिळाले असून भविष्यातही त्यांनी अधिक जोमाने शैक्षणिक प्रगती साधावी असा संदेश देण्यात आला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे –…