Home निधन वार्ता काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

0 second read
0
0
112

no images were found

काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

कोल्हापूर: काँग्रेसचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार. पी. एन. पाटील यांचे निधन झाले. आज गुरुवारी पहाटे वयाच्या ७१ व्या वर्षी पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला . बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर गेल्या ४ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दुपारी 1 वाजता सडोली खालसा येथे अंत्यविधी होणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील रविवारी सकाळी बाथरुममध्ये पडल्याने यांच्या हाताला व डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना तातडीने कोल्हापुरातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर तातडीने शस्त्रक्रियाही करण्यात आली होती आ.पी एन. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वासोच्छ्रास आणि संपूर्ण जीवरक्षक यंत्रणे द्वारे उपचार सुरू होते त्यांच्या प्रकृती विषयी विविध मंदिरात प्रार्थना करण्यात येत होत्या मात्र आज गुरुवारी 23 मे रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.

आमदार पी एन पाटील यांचे पार्थिव आज सकाळी 10 वाजता काँग्रेस कमिटी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच.11 वाजता सडोली खालसा अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे तर दुपारी 1 वाजता सडोली खालसा येथे अंत्यविधी होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार कोल्हा…