
no images were found
ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ आणि कॅन्सर चिकित्सक डॉ. राधिका जोशी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर(प्रतिनिधी) : डॉ. राधिका नंदकुमार जोशी कोल्हापूरमधील यशस्वी ज्येष्ठ स्त्रीरोग व कॅन्सर चिकित्सक आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा गौरवशाली वैद्यकीय कारकिर्दीत आजही उत्साहाने त्या कार्यरत आहेत. कॅन्सर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना नुकताच असोसिएशन ऑफ वुमन इन इंडिया यांच्यावतीने दिला जाणारा डॉ. सरिता भालेराव प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.राधिका जोशी यांनी १९६७ मध्ये शिवाजी विद्यापीठ मधून MBBS ही पदवी मिळवली. त्यानंतर मुंबईमध्ये कामा आणि अबलेस हॉस्पिटल ,जे.जे.हॉस्पिटल, महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी काम करून ,DGO,DFP,FICOG या पदव्या मिळवल्या.
कॉल्पोस्कॉपी व सायटोलॉजी चे ट्रेनिंग त्यांनी १९७९ ते १९८० ला इंग्लंड मध्ये घेतले.लंडन येथील सेंट मेरी हॉस्पिटल येथे डॉ.एलिझाबेथ बटलर यांच्या सोबत त्यांनी १८ महिन्याचे ट्रेनिंग घेतले. आणि कोल्हापुरात येऊन त्यांनी १९८१ पासुन आजपर्यंत स्वत:च्या हॉस्पिटल मध्ये आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम करत आहेत. कृष्णा हॉस्पिटल, कराड मध्ये १० वर्षे कॅन्सर चिकित्सक म्हणून केले. २०१७ मध्ये अडवाणी ब्रिगेन्जा ओरिएशन पुरस्कार त्यांना मिळाला.
२००३ मध्ये भारतातले पहिले FOGSI मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्र त्यांनी सुरु करुन व त्यांनी ५०० स्त्रीरोग तज्ञांना प्रशिक्षित केले.
गर्भाशय मुखाचा आणि स्तनाचा कर्करोग, रजोनिवृत्ती, किशोरवयीन आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या विषयांवर जनजागृती कार्यक्रम आयोजित केले. व अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. जागरूकता कार्यक्रमासोबतच त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात अनेक मोफत कॅन्सर तपासणी शिबिरे मुलींसाठी घेतली. याचसोबत त्या न्यू लाइफ फौंडेशनसोबत अनेक अवयव दानाचे जनजागृती उपक्रम राबवत आहेत.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, प्रसूतीतज्ञ संघटनेच्या माजी अध्यक्षा म्हणून यशस्वीरित्या काम पहिले आहे. १९९३ मध्ये शिकागो तसेच चीन, दक्षिण आफ्रिका, इस्राएल या ठिकाणी भेटी देऊन पेपर सादर केले. ब्रिटीश कोलंबियामध्ये कॅन्सर स्क्रीनिंगला उपस्थित राहिल्या. तर २००९ ढाका आणि नेपाल मध्ये त्या कॉल्पोसकॉपी प्रशिक्षण देण्यासाठी गेल्या. त्याचबरोबर मालदीव सारख्या वेगळ्या बेटावर त्यांनी महिलांसाठी तपासणी शिबिरे घेतली. दिल्ली .कोलकत्ता ,गोवा ,बंगलोर, जामननगर ,सुरत ,बीड ,सोलापूर ,
जयपूर ,कराड ,अमरावती ,इस्लामपूर ,पुणे ,लुधियाना ,गुवाहाटी ,नाशिक ,धुळे ,नागपूर ,जयसिंगपूर ,सांगली अशा अनेक ठिकाणी त्यांनी कार्यशाळा , वैद्यकिय परिषदांमध्ये हजेरी लावली.
२०१८ मध्ये स्वीझेर्लंडमध्ये गर्भाशय मुखाचा आणि एच.पी.व्ही.(ह्युमन पापिलोमा व्हायरस) या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चेत भाग घेतला.
२०२० मध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंध या प्रसंशनीय कार्याबद्दल सत्काराचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले. २० मार्च २०२२ मध्ये कोल्हापूर मेडीकल असोसिएशनचा डॉ.अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. आयएमए महाराष्ट्र राज्य इंप्रेस पुरस्कार २०२२ मध्ये त्यांना मिळाला. सव्हायकाल सायटोलॉजी आणि कॉल्पोस्कॉपी या विषयावरील प्रतिबंध-स्त्री कॅन्सरचा (गर्भाशय आणि स्तन) हे मराठी पुस्तक त्यांनी सर्वांसाठी लिहिले.
डॉ. राधिका जोशी यांनी गर्भाशय मुखाच्या कॅन्सर पेशींचे अचूक निदान करता यावे यासाठी spatula बनवला व त्याला भारत सरकारची “पेटंट” म्हणून मान्यता मिळाली.
यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून अनेक शिबिरे घेतली. ट्रस्टच्या माध्यमातून १९२३ पासून डॉ. राधिका जोशी यांनी आपले सगळे लक्ष आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधात्मक लस देण्यसाठी वळविले. २०२३ मध्ये १६५० मुलींना मोफत लस देण्यात आली. २०२४ मध्ये जास्तीत जास्त गरजू मुलींना मोफत लस देण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या गुरु डॉ. उषा सरैय्या,मुंबई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.