Home सामाजिक गोव्यात ‘नेचरमाइल्स अवेअरनेस वॉक’, स्वच्छता मोहीम

गोव्यात ‘नेचरमाइल्स अवेअरनेस वॉक’, स्वच्छता मोहीम

16 second read
0
0
30

no images were found

गोव्यात नेचरमाइल्स अवेअरनेस वॉक‘, स्वच्छता मोहीम

 

पणजी: आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनानिमित्त वनअर्थ फाऊंडेशनतर्फे नेचरमाइल्स अवेअरनेस वॉक‘ हा निसर्गाशी सखोल संबंध जोडण्यासाठी आणि पर्यावरणीय उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेला मनोरंजक शैक्षणिक उपक्रम बुधवारी पार पडला. उत्तर गोव्यात पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी जणू स्वर्ग असलेल्या निसर्गरम्य बाटीम तलाव येथे २२ मे रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत आयोजित उपक्रमात अनेक निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदवला.बाटीम या मनमोहक गावात भातशेतीने वेढलेले बाटीम तलाव‘ विविध पक्ष्यांच्या प्रजातींना आकर्षित करते. तसेच गोव्याची समृद्ध जैवविविधता आणि नैसर्गिक परिसंस्थेचे संरक्षण करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करते. वनअर्थ फाऊंडेशनचे प्रकल्प सहायक तथा वनस्पतिशास्त्र पदवीधर आणि पक्षीप्रेमी एडन फोन्सेका यांनी या वॉकचे नेतृत्व केले. या उपक्रमाद्वारे विविध पार्श्वभूमी असलेल्या लोकांना बाटीम तलावाच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेणेस्थानिक वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करणेसमविचारी व्यक्तींसह गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे असलेल्या पर्यावरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी एकत्र आणण्यात आले.

पर्यावरणीय समतोल राखण्यात जैवविविधतेच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर देऊन नेचरमाइल्स वॉकमध्ये सहभागी व्यक्तींना नैसर्गिक अधिवासात कचऱ्याचे परिणाम समजून घेण्यासाठी आणि अधिक शाश्वत वर्तनाकडे वळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बाटीम तलावाभोवती स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली. हा उपक्रम संस्थेच्या जागरुकता वाढवणेकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि रिड्यूसरियूजरिपेअररिपेअर आणि रीसायकल या पाच रचनांचे पालन करण्याच्या उद्दिष्टांशी जोडण्यात आला.आपण निसर्गाचा भाग आहोत आणि निसर्गही आपला भाग आहे. कधीकधी आपण जीवनाच्या या सत्यापासून दूर जातो. म्हणूनच कधीकधी आपण जंगलाच्या हाकेला साद देतो आणि पृथ्वीच्या सौंदर्यात मग्न होतोहे महत्वाचे आहे,’ असे वनअर्थ फाऊंडेशनचे संस्थापक आणि संचालक फर्डिन सिल्वेस्टर म्हणाले.

शून्य कचरा‘ उपक्रमासाठी आम्ही सहभागींना नॉन-प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या आणण्याचे आवाहन त्याचबरोबर अल्पोपाहारात जवळपासच्या विक्रेत्याकडून स्थानिक फळांचा समावेश केला होता. उपक्रमांदरम्यान आम्ही घरगुती कम्पोस्ट खताचे महत्त्वकचरा विलगिकरण आणि कचरा व्यवस्थापनामध्ये वर्तुळाकार प्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत जागरुकता वाढवल्याचेही फर्डिन यांनी सांगितले. प्लास्टिक कचरा समुद्रात आणि जमिनीत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी आणि त्याचे विविध उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यासाठी वनअर्थ फाऊंडेशनने प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले. उपक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींना भविष्यात सरकारी शाळा आणि महाविद्यालयांत पर्यावरणीय शिक्षण आणि तरुणांमध्ये शाश्वत पद्धतींना चालना देणाऱ्या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहेअसे फर्डिन यांनी सांगितले. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस प्रत्येकाने आनंदाने साजरा केला आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने पाऊल टाकले. आम्ही आमचा नैसर्गिक वारसा जतन करणे आणि शाश्वत जीवन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रभाव पाडल्याचे फर्डिन म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …